Sanjay-Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sarkarnama Headlines : गिरीश महाजनांना राऊतांचा खोचक सवाल ; सरनाईकांविरोधात मनसे आक्रमक -वाचा महत्त्वाच्या घडामोडी

Sarkarnama Headlines Maharashtra Politics: दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे जाणून घेऊयात

Mayur Ratnaparkhe

गिरीश महाजनांवर राऊतांचा निशाणा

गिरीश महाजन यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष सुजवायचा! भ्रष्टाचारी देशद्रोही आपल्या पक्षात घेऊन आम्हीच मोठे अशी वल्गना करायची! हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघालाय! असं संजय राऊतांनी लगावला टोला

प्रताप सरनाईकांविरोधात मनसे आक्रमक

महायुती सरकारमधी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बॅनरबाजी केली आहे. मुंबईची मातृभाषा हिंदी झाल्याचे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं होतं. त्यानंतर एका कवितेच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांच्यावर मनसे कडून टीका करण्यात आली आहे .

''मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येणारा तू तर दुतोंडी साप, मराठी भाषेचा अपमान करतोय कुठे फेडशील हे पाप.'' अशा अशा याचे बॅनर लावत मनसेकडून मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने दिला इशारा

विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करून जर तुमचे खिसे भरायचे असतील आणि सामन्यांना वेठीस धरायचं असेल तर.... याद राखा! मुंबईकर प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असं म्हणत ठाकरे गटाने इशारा दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट कार्यरत असून तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर तयार केला असून एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, एसआरए यांचे एक सर्कल आहे. यासाठी लाडके अधिकारी नियुक्त केले जातात आणि यातून लाडका ठेकेदार योजना राबविली जाते, तसेच या सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे. असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT