Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Updates: जिल्हा परिषदेतील 30 महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणार

Maharashtra Politics Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय व प्रशासकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर.

Amit Ujagare

Mumbai Live : जिल्हा परिषदेतील ३० महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणार

जिल्हा परिषदेतील ३० महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे. ३० महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण केल्याचे पुरावे विशाखा समितीकडे पाठवण्यात आले आहेत. दोन दिवसांत विशाखा समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. अहवाल आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करणार, तसंच कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.

Washim Live : शेतकऱ्याने पेरले भाजपचे झेंडे, आता तरी कर्ज माफी द्या

शेतमालाला भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी याकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील तीन एकरात भाजपचे झेंडे पेरले आहेत. हे झेंडे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सुरू असलेल्या पदयात्रेदरम्यान माजी आमदार बच्चू कडू यांनाही या झेंड्यावरून महायुती सरकारवर टोलेबाजी केली. तुमच्या पक्षाचे झेंडे पेरले आतातरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केली.

Mumbai Live : भाजप खासदार निशिकांत दुबे यांचं वक्तव्य निंदनीय- सुनील तटकरे

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय आहे. देशात महाराष्ट्राचं योगदान नाकारता येणार नाही. मराठी माणसाचं योगदान नाकारण्यासारखं नाही. देशाच्या एकात्मतेला नुकसान पोहोचवणारं त्यांचं विधान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दुबे यांची निंदा केली आहे.

Mumbai Live : यंदा महापालिका निवडणुकांमध्ये हवा झाली पाहिजे - सुनील तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गेल्या ३ वर्षांपासून झालेल्या नाहीत. ऑक्टेंबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हवा देखील झाली पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

Mumbai Live : सरन्यायाधिशांना भेटले विरोधक, प्रशासकीय समस्यांबाबतचं दिलं पत्र

विरोधी पक्षातील आमदारांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट. तसंच राज्यात सरकारकडून अडवण्यात आलेल्या काही गोष्टींबाबत माहिती देणारं पत्र देण्यात आलं. तसंच शिवसेनेच्यावतीनं सुप्रीम कोर्टात पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर लक्ष घालण्यासाठी पत्र देण्यात आलं.

Nashik Live : शालेय शिक्षण मंत्र्यांची 'दादा'गिरी! महापालिकेच्या शाळेत शालेय शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाचा प्रस्ताव

नाशिकमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची दादागिरी पाहायला मिळाली. महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेतच त्यांचं राजकीय कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १ कोटी रुपयांचा खर्च देखील करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT