school Sarkarnama
महाराष्ट्र

शाळा सुरू होणार पण खेळ, सामुहिक प्रार्थना नाही ; अजूनही बरेच काही

(Guidelines have been issued by Health Department at Zilla Parishad, Municipal level.)दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूटांचे अतंर, शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक.

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः राज्यातील पहिली ते सातवीच्या वर्गाची शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण हा निर्णय घेत असतांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश व मार्गदर्शक तत्तवे देखील जारी करण्यात आले आहेत. आरोग्य संचालनालयाच्या वतीने शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, नियम या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

१ डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा तब्बल दीड वर्षांनी वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागकडून जिल्हापरिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी त्यासोबत जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना शाळांसाठी काढण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन राज्यातील सर्व शाळांनी करायचा आहे. यानंतर शिक्षण विभाग या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शिक्षण अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत शासन निर्णय जारी करेल.

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूटांचे अतंर, शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक, वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिति पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम म्हणजेच खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.

ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी, मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये,आवश्यक नियमांचे पालन करावे. शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोना बाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा.

शाळांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. क्वारंटाईन विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्याची व्यवस्था देखील शाळांनी करावी, असे सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT