sexual harassment case Sarkarnama
महाराष्ट्र

Sexual Harassment Case : तब्बल 30 महिलांचा लैंगिक छळ; जिल्हा परिषदेच्या मोठ्या अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, चौकशीही होणार!

30 Women Harassing arassing Ravindra Pardeshi : नाशिक जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने पदाचा दुरुपयोग केला. कार्यालयातील आणि अन्य 30 महिलांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या अधिकाऱ्यावर थेट राज्य शासनानेच कारवाईची घोषणा केली आहे.

Sampat Devgire

Ravindra Pardeshi Suspended : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी तब्बल 30 महिलांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांनी या संबंधी तक्रार केल्यानंतर विशाखा समितीच्या मार्फत अधिकाऱ्याची चौकशी सुरू होती. मात्र, संबधित अधिकारी हा मोठ्या पदावर असल्याने चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे तक्रार करणाऱ्या महिला दडपणाखाली होत्या. या प्रकरणी आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने याबाबत थेट आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार दराडे यांनी केली. आमदार मनीषा कायंदे यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यापूर्वीच कारवाई का झाली नाही? असा प्रश्न केला होता.

मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना तातडीने निलंबित करण्याची घोषणा केली. त्याच्या अधिकार असलेल्या शासकीय समितीमार्फत येथे तीन महिन्यात संबंधित अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल. या चौकशीच्या अहवालानंतर त्याला कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात येईल का? याचाही शासन विचार करेल असे मंत्री गोरे यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा परिषदेत घडलेला प्रकार धक्कादायक असून संबंधित अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करत होता. प्राप्त अधिकाराच्या माध्यमातून असाहाय्य महिला कर्मचाऱ्यांचा छळ त्याने केला होता. असंख्य महिला या छळाच्या पिढीत आहेत. त्याबाबतच्या लिखित तक्रारी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे या अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असा आग्रह आमदारांनी धरला.

महिला कर्मचाऱ्यांचा छळ

नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेश हे महिलांचा अतिशय विकृत पद्धतीने छळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बाळंतपणाची रजा मागण्यासाठी गेलेल्या महिलेला ती योग्य प्रतिसाद देत नाही हा परदेशी यांचा राग होता. त्यामुळे ती महिला नऊ महिन्याची गरोदर असताना दिवसभर कार्यालयाच्या दरवाजावर उभे ठेवण्यात आले. त्याबाबत अन्य कर्मचाऱ्यांमध्येही परदेशी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता.

विशाखा समितीकडून चौकशी सुरू

परदेशी यांची जिल्हा परिषद कार्यालयातील विशाखा समितीने चौकशी सुरू केली होती. कार्यकारी अधिकारी मित्तल यांनीही याबाबत महिलांना तक्रारी असल्यास सादर करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले होते. विधिमंडळातील चर्चेनंतर हे नाव पुढे आले असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्यावर अखेर कारवाई झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT