Shabbir Ahmed Ansari death  Sarkarnama
महाराष्ट्र

Shabbir Ahmed Ansari death : ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज हरपला! भुजबळ म्हणाले, माझी वैयक्तिक मोठी हानी...

OBC Leader, Chhagan Bhujbal Reaction : शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची जी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Rajanand More

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन झाले आहे. ओबीसी चळवळीचा लढवय्या नेता म्हणून ते परिचित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते.

छगन भुजबळ यांनी सोशल मीडियात पोस्ट करत अन्सारी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की, निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावला आहे. शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते.

मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आहे. शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची जी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली आहे.

'मंडलनामा' या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी स्वतःचा आणि मुस्लिम ओबीसी संघटनेचा जो खडतर प्रवास मांडला आहे, तो सामाजिक चळवळीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या हक्कासाठी सदैव प्रेरणा देत राहील. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते, ही माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहणारी बाब आहे, असे भुजबळांनी नमूद केले आहे.

अन्सारी साहेबांनी मांडलेली भूमिका आणि त्यांनी दिलेला लढा हा केवळ मुस्लिमांसाठी नसून तो संपूर्ण वंचित घटकांसाठी होता. स्व. विलासराव देशमुख, शरद पवार साहेब यांच्यापासून ते युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढला. त्यांच्या जाण्याने समता परिषदेची आणि माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. एक सच्चा आणि लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला आहे, असे भुजबळ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT