Farmers protesting against land acquisition for the proposed Nagpur-Goa Shaktipeeth Expressway Sarkarnama
महाराष्ट्र

Shaktipeeth Highway : कृषी दिनीच शेतकरी रस्त्यावर; शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनी वाचवण्यासाठी 12 जिल्ह्यात चक्काजाम

Shaktipeeth Highway Protest : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृषी दिनीच राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Rahul Gadkar

Shaktipeeth Highway Protest : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृषी दिनीच राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. पर्यायी महामार्ग आणि रस्ते असताना राज्याला कर्जबाजारी आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा महामार्ग तत्काळ रद्द करावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

कोल्हापूरमध्येही पुणे-बंगळूरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे पुलाची शिरोली येथील पंचगंगा नदी पुलावरून आंदोलनाला सुरुवात झाली. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्‍या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. दरम्यान, या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांना बंदी आदेशाची नोटीस पाठवली आहे.

याबाबत बोलताना संघर्ष समितीने म्हटले की, शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. पर्यायी महामार्ग आणि रस्ते असताना राज्याला कर्जबाजारी आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा महामार्ग तत्काळ रद्द करावा. राज्य शासनाकडून प्रस्तावित असणारा शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांतून जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात असून हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

आंदोलनकर्त्यांना रात्रीत नोटीस :

आंदोलनकर्ते नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना पोलिसांनी बंदी आदेशाची नोटीस पाठवली आहे. जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू आहे. बंदी आदेशात चक्काजाम आंदोलन करून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्यास किंवा शांततेचा भंग झाल्यास कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अरुण लाड, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह इतरही नेत्यांना शिरोली पोलिसांनी ही नोटीस दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT