Chhagan Bhujbal and Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar and Ajit Pawar news : राज्यात भूकंप होणार, शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार; छगन भुजबळ पंचांग पाहणार

Chhagan Bhujbal Jalgaon Sharad Pawar Ajit Pawar political update Maharashtra : शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर छगन भुजबळ यांनी जळगावमध्ये मोठे विधान केले.

Pradeep Pendhare

Maharashtra politics update : राज्यातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर बऱ्याच उलथापालथी घडत आहेत. सत्ताधारी पक्षात इनकमिंग वाढले आहे. आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सदस्य सत्ताधाऱ्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. विरोधकांकडील दिग्गजांचे प्रवेश होतील, असे म्हणत सत्ताधारीच महाराष्ट्रातील वातावरण अधिक ढवळून काढत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकताच भेट झाली. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यातच आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चांना धुमारे फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जळगाव दौऱ्यावर आहे. समता परिषदेचा मेळाव्यातून त्यांनी राज्यात शक्तिप्रदर्शन केले. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने भुजबळ नाराज आहेत. समता परिषदेतून त्यांनी राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दौऱ्याचे नियोजन केले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने डावलले गेलेले छगन भुजबळ हे अजितदादांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात आहे. त्यामुळे ते कोणता राजकीय भूकंप घडवून आणतील याचा नेम नाही. आता पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर मोठं विधान केलं आहे.

छगन भुजबळ यांना शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येण्यावर मोठं भाष्य केले. यासंदर्भात पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो, असे भुजबळ यांनी म्हटले.

नंबर एक होण्यासाठी काही गोष्टी...

राज्यात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा होईल, असे काही नेते सांगत आहेत. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, "असे काही होत असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण एक नंबर पक्ष करण्यासाठी काय काय करावे लागते, हे लक्षात घ्यावे लागेल. राज्यात या ज्या गोष्टी घडत आहेत, त्या तात्काळ थांबवाव्या लागतील".

भुजबळांनी पक्षनेतृत्वाचे कान टोचले

भाजपचे आमदार किती, भाजपचे आमदार सव्वाशे पेक्षा जास्त झालेले आहेत आणि ते वाढतच चालले आहेत. त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं आहे याचा विचार करून काम करावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हणत पक्षप्रमुखांचे एकप्रकार कान टोचले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT