Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवार अन् अजित पवार पुन्हा एकत्र येणार ! 10 दिवसांत तिसऱ्यांदा होणार भेट

Sharad Pawar and Ajit Pawar meeting News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्या 10 दिवसांत तिसऱ्यांदा भेट होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन वर्षापूर्वी उभी फूट पडली होती. या पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संवाद जवळपास कमी झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अन् उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले होते. मात्र, त्या बैठकीवेळी काकांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले होते.

त्यानंतर सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीवेळी अजित पवार आणि शरद पवार हे एकमेकांच्या शेजारी देखील बसले होते. त्यानंतर आता 21 एप्रिलला पुण्यातील साखर संकुल येथे होणाऱ्या AI विद्याच्या बैठकीसाठी दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. यानिमित्ताने गेल्या 10 दिवसांत दोघांची तिसऱ्यांदा भेट होणार आहे.

पुण्यातील साखर संकुल येथे 21 एप्रिलला होणाऱ्या AI विद्याच्या बैठकीसाठी दोन्ही पवार एकत्र येणार आहेत. यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यात शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रीत आलेले पहावयास मिळाले.

यानंतर शनिवारी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार दोघे एकत्र आले होते. या बैठकीवेळी दोघांचीही आसनव्यवस्था एकमेकांच्या बाजूलाच करण्यात आली होती. यावेळी या दोघांजणामध्ये संवाद झाला होता.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा पुण्यानजीकच्या फार्म हाऊसवर पार पडला. या कार्यक्रमास शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. जय पवार यांना आर्शिवाद देण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र आल्याचे बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांना भेटण्यासाठी जय पवार आणि त्यांची होणारी पत्नी हे देखील गेले होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT