Harshvardhan Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Harshvardhan Patil: 'तुतारी' हाती घेतलेल्या अन् 'आमदार'कीसाठी इच्छुक असलेल्या हर्षवर्धन पाटलांवर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

Political News : हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची इंदापूर मतदारसंघातील उमेदवारी जवळपास फायनल झाली आहे. त्यांच्याकडे आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी होणार आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडे आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर त्यांची इंदापूर मतदारसंघातील उमेदवारी जवळपास फायनल झाली असतानाच आता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय बोर्डात समावेश केला आहे. राष्ट्रवादीने त्यांच्यावर आता संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. (Harshvardhan Patil News)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच हर्षवर्धन पाटील यांच्यावर संघटनात्मक नवी जबाबदारी दिली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची उमेदवारी फायनल झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी दीड ते दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला तर तो व्यक्तिगत निर्णय होईल, असे म्हणत भाजपची साथ सोडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT