Sharad Pawar PM Narendra Modi  Sarkarnama
महाराष्ट्र

Baramati News : PM मोदींना थेट बारामतीला आणण्याच्या हालचाली : दिल्लीतील भेटीनंतर शरद पवारांचा आणखी एक डाव; कारणही आलं समोर

Sharad Pawar News: दिल्लीतील जंतर मंतर येथे दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदी यांना संसदेत भेटले होते. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती.

Deepak Kulkarni

Baramati News: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे ही भेट जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी अन् विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं असताना झाली होती. दिल्लीतील घडामोडींनंतर आता शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट बारामती आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बारामतीत विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षस्थानी मंगळवारी (ता.28 जुलै) अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांचा 9 फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमा संदर्भात विद्या प्रतिष्ठानच्या या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत गौतम बुद्धांच्या डोमचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.

शरद पवारांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधील बुद्धाचा पुतळा,तसेच संग्रहालयातील वस्तूंच्या कामाची पाहणी केली. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे. तसेच विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली. या बैठकीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींना गौतम बुद्धाच्या डोमचे अनावरण कार्यक्रमाला बोलवण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवार विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून मोदींना पुन्हा एकदा बारामतीत येण्याचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांचा 9 फुटी बुद्धांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याचबरोबर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसारख्या 13 महामानवांची पेंटींग्ज देखील तिथे असणार आहेत.

या कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित नसली तरी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त किंवा 16 ऑक्टोबरला या डोमचे अनावरण मोदींच्या हस्ते व्हावं यासाठी शरद पवार हे प्रयत्नशील आहेत. प मोदींना निमंत्रणाचं आत्ता फक्त ठरलं आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांना कार्यकमाला येण्याचं आमंत्रण देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाबाबतच्या निमंत्रणाबाबत शरद पवार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याबाबत ते दिल्लीत गेल्यानंतर ते मोदींची भेटही घेण्याची शक्यता आहे. सध्यातरी मोदी किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून या आमंत्रणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.मात्र, पवारांच्या नव्या राजकीय बॉम्बनं विरोधकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

कारण विरोधकांच्या इंडिया आघाडीनं केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील जंतर मंतर येथे दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदी यांना संसदेत भेटले होते. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती. यानंतर आता पवारांकडून मोदींना बारामतीत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT