Dhirayasheel Mohite Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Dhirayasheel Mohite Patil : निवडणुकीच्या धामधुमीत धैर्यशील मोहिते पाटील थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमकं काय कारण?

NCP MP Dhirayasheel Mohite Patil Meeting Amit Shah before Maharashtra elections : राज्यात निवडणुकीची धामधुम सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अमित शाहांची भेट का घेतली? जाणून घ्या.

Rashmi Mane

Sharad Pawar NCP MP meets Amit Shah : माढ्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय बनली आहे. मागील काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे.

मोहिते पाटील यांनी नुकत्याच एका जाहीर सभेत “मला जेलमध्ये टाका, मी सोलापूरसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे” असे विधान केले होते, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर आणि स्थानिक राजकारणावर जोरदार लक्ष गेले. नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यानही मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यात मतभेद स्पष्ट दिसून आले होते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना खुले आव्हान देत होते, त्यामुळे मोहिते पाटील यांची अमित शहा यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली.

मोहिते पाटील यांच्या दिल्लीतील भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्र आणि विशेषतः दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध समस्यांवर यावेळी चर्चा झाली. मोहिते पाटील यांनी राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी, सहकारी दूध संघ आणि सहकार क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत आपली भूमिका मांडली.

यावर अमित शहा यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि बनास डेअरी (गुजरात) येथे सहकार मंत्रालयाच्या अभ्यास दौऱ्यासाठी आवश्यक संधी व सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले.

या भेटीमुळे सोलापूरमधील स्थानिक निवडणुका, पक्षातील नेत्यांशी संबंध आणि राजकीय तणावावर याचा काय परिणाम होईल, हे पुढील काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या या भेटीमुळे मोहिते पाटील यांचा राजकीय वेध अधिक स्पष्ट झाला असून, सोलापूरमधील राजकीय वातावरणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील यांच्या या दिल्ली दौर्‍यामुळे स्थानिक राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव पडेल की नाही, यावर सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT