EVM Vote Chori Live Presents Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

EVM Vote Chori Live Presents : ईव्हीएमद्वारे मत चोरी कशी होते? शरद पवारांच्यासमोरच दिला डेमो, स्वतः विचारली शंका!

Sharad Pawar NCP Vote Chori : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवशीय शिबिर नाशिकमध्ये सुरू आहे. या शिबिरात ईव्हीएमद्वारे मत चोरीचे लाईव्ह डेमो देण्यात आला.

Roshan More

Vote Chori News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिकमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिरात ईव्हीएमद्वारे मत चोरी कशी केली जाते याचा डेमो देण्यात आला. फक्त ईव्हीएमध्येच नाही तर मतदान केल्यानंतर जी चिठ्ठी बाहेर येते (व्हिव्हीपॅट) त्यामध्ये देखील फेरफार करण्यात येत असल्याचे यामध्ये डेमोमध्ये दाखवण्यात आले. हे सादरीकरण सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते.

सादरीकरण करणाऱ्यांनी केळी, सफरचंद आणि कलिंगड या फळांचा चिन्ह म्हणून वापर केला. सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, चोरीचे प्रोग्रामींग टाकले असेल तर मत चोरी होते. व्हिव्हिपॅटमध्ये फेरफार करता येतो. चोरीचे प्रोग्रामींग निवडणूक आयोगाच्या मशिनमध्ये असेल तर तेथे देखील मतांची चोरी होते असेल.आम्ही हे निवडणूक आयोगाला दाखवण्यासाठी त्यांच्याकडील ईव्हीएम मशिची आणि त्यासोबतच्या इतर साहित्याची मागणी केली. मशिनच्या किंमतीचे 4 हजाराचा डीडी देखील त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाठवला होता. त्यांना पत्र दिले होते मात्र त्यांचे उत्तर आले नाही.

लाईट सेन्सरच्या माध्यमातून देखील मत चोरी कशी होते हे सादरीकरण करणाऱ्याने दाखवली तसेच व्हिव्हिपॅट अडकले असे आपण समजून निघून जातो मात्र त्याद्वारे देखील मत चोरी होत असते. व्हिव्हिपॅटवर तुम्ही ज्याला मत दिले ते चिन्ह दिसते मात्र त्याची शाई जर उडून जाणारी असेल तर त्यामाध्यमातून देखील मत चोरी होऊ शकते. त्याच व्हिव्हिपॅटच्या विरोध बाजुला तुम्ही मत न दिलेले चिन्ह असू शकते, असे सांगितले.

शरद पवारांनी विचारली शंका

सादरीकरणानंतर शरद पवार यांनी शंका विचारली. ते म्हणाले, माझ्या मते तिन्ही खूणा दाखवताना मोटार, बैलगाडी आणि काही तरी दुसरी खूण दाखवा. त्यावेळी सादरीकरण करणाऱ्याने सांगितले की, तशा खुणा प्रोग्राम कराव्या लागतील. त्यानंतर ते मशिनमध्ये दाखवता येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT