Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांना विधानसभेत बसलेला फटका 'स्थानिक'च्या निवडणुकीत बसणार नाही; आयोगाकडून ही मागणी मान्य

Local Body Election 2025 Sharad Pawar NCP: निवडणूक चिन्हांच्या यादीत पिपाणी या चिन्हाला 'तुतारी' नाव होते. या नामसाधर्म्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता.

Mangesh Mahale

लोकसभा,विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा धोका नसेल, कारण निवडणूक आयोगाने चिन्हांच्या यादीतून पिपाणीला वगळलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते. पण पिपाणी हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिल्याने शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक फटका बसला होता.

पिपाणी हे चिन्ह गोठविण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करीत पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे.निवडणूक चिन्हांच्या यादीत पिपाणी या चिन्हाला 'तुतारी' नाव होते. या नामसाधर्म्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता.

पिपाणी हे चिन्ह वगळा, अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मात्र आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली आल्याने पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चिन्हांतील गोंधळामुळे ‘पिपाणी’ चिन्हांवर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांना राज्यात लाखो मतं मिळाली. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत नावही ‘तुतारी’ असं आहे. चिन्ह आणि नाव यातील साधर्म्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणारी अनेक मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे. त्यामुळंच ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली होती.

पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे शरद पवारांच्या पक्षाला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. मतदारांनी चुकीच्या चिन्हावर (पिपाणी) मतदान केले, ज्यामुळे पक्षाच्या तुतारी चिन्हाला मतांचे विभाजन झाले आणि एकूण 9 जागांवर उमेदवार पराभूत झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे यापूर्वी शरद पवारांच्या पक्षाने केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांना जसा या चिन्ह साधर्म्यामुळे फटका बसला तसा कोणताही प्रकार आता होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT