Sharad Pawar, Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Vote Chori : 'राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बाॅम्ब'विषयी माहिती नाही पण...', शरद पवारांनी 'ती' शंका परत बोलून दाखवली

Sharad Pawar Rahul Gandhi Hydrogen Bomb : शरद पवारांनी मत चोरी विषयी तसेच राहुल गांधी घेणार असलेल्या पत्रकार परिषदेविषयी आपले मत मांडले आहे. विधानसभेचा निकाल सांगत त्यांनी शंका देखील उपस्थित केली आहे.

Roshan More

Sharad Pawar Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (गुरुवारी) सकाळी विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल गांधींनी या आधी मतचोरीचा हायड्रोजन बाॅम्ब टाकणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मतचोरीबाबत ते मोठा खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राहुल गांधी नेमके आज काय बोलणार याविषयी आपल्याला देखील माहिती नसल्याचे सांगितले.

शरद पवार यांना मत चोरीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले, 'आमचा उमेदवार सलग 25 वर्ष निवडून येत होता. त्याच्या शेजारच्या मतदारसंघात देखील पाच वेळा उमेदवार निवडून आला होता. मात्र, दोघांच्या पराभवातील अंतर एक हजार 906 असे होते. दोघांच्या पराभवाचे आकडे समान आहेत. त्यामुळे शंका निर्माण होते. माझ्याकडे काही पुरावे नाहीत.मात्र शंका निर्माण होते.'

'

राहुल गांधी मतदारसंघ घेऊन, मतदार यादी घेऊन हे असं आहे हे दाखवून देत आहे. हे होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा, याची घबरदारी आयोगाने घेतली पाहिजे. आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास उडेल अशी भूमिका आयोगाने घेतली तर मला माहिती नाही देश किती वर्ष हे सहन करेल. ', असा इशारा देखील त्यांनी दिला.

300 खासदार रस्त्यावर उतरले

'इलेक्शन कमिशन कडून काही निर्णय घेतले गेले त्याच्याविषयी भारतीय जनता पक्ष वगळता विरोधी पक्षात नाराजी होती. पार्लमेंटचे जे अधिवेशन झाले त्यावेळी माझ्यासह 300 खासदार रस्त्यावर उतरले. मोर्चा काढला. एक गोष्टी लक्ष्यात घ्या 300 खासदार रस्त्यावर येतात ही दुर्लक्षित करण्याची बाब नाही. आमचा हेतू होता निवडणूक आयोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांनी सांगितले पाच जण भेटायला या. 300 खासदार रस्त्यावर होते त्यांच्याशी बैठकीला अटीतटी घालणे योग्य नाही. अटीतटीमुळे भेटू शकलो नाही.', असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

...तर लोकं शांत बसणार नाहीत

नाशिकमध्ये आमचे शिबिर झाले. तेथे काही लोकांनी दाखवलं मशिन मतपत्रिकेत मत दिलं एकाला गेलं कमळाला. याचा अर्थ कुठतरी गफलंत होतीये, अशी भावना लोकांच्यामध्ये झाली. कलेक्टीव्ह अॅक्शन घेऊन ती दुरस्त केली नाही तर लोक कायमच शांत असतात असे नाही. लोक याबाबत बोलतात याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, असे देखील ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT