Sharad Pawar On Maratha reservation Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar On Maratha reservation : मराठा आरक्षण; शरद पवारांनी सांगितले जबाबदारी कुणाची...

Sharad Pawar Maratha reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवताना राज्यातच तो सोडवावा लागेल, दिल्लीत हा प्रश्न घेऊन जाऊन उपयोग होणार नाही. त्याला राज्य सरकारच्या नेतृत्वाकडून उत्तर मिळाले पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणी सोडवला पाहिजे, यावर शरद पवार यांनी मोठं विधान केला आहे.

"हा प्रश्न पहिल्यांदा राज्याचा, राज्य सरकारचा, राज्याच्या नेतृत्वाचा आहे. दिल्लीत जाऊन याचा उपयोग होणार नाही. प्रश्न इथला आहे, तो इथंच सोडवावा लागेल", असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मराठा आणि ओबीसी आरक्षणावर (Maratha reservation) आमची भूमिका सुसंवादाची असल्याचे स्पष्ट केले. हा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणासाठी लढणाऱ्यांना एकत्र आणावे लागणार आहे. यासाठी राज्य सरकार आणि राज्याच्या नेतृत्वाने पुढाकार घ्यावा लागले. यावर आम्ही सुसंगत आणि विश्वासाची भूमिका घेत आहोत. काय हातभार लावयचा, तो सकारात्मक पद्धतीने लावू, असे शरद पवार यांनी सांगितले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा लोकसभेपर्यंत पोचला पाहिजे. दिल्लीतून यावर काही होईल का? शरद पवार (Sharad Pawar) यांनी आरक्षणाचा मुद्दा कुठला आणि त्यावर कोणी काम केले पाहिजे, यावर स्पष्ट भूमिका मांडली. "हा प्रश्न पहिल्यांदा राज्याचा, राज्याचे नेतृत्व, राज्य सरकार, राज्यात यावर मार्ग निघावा, अशी राज्याची भूमिका असली पाहिजे. मार्ग काढण्यासाठी हातभार लावण्याची गरज असते. परंतु दिल्लीत जाऊन उपयोग होणार नाही, प्रश्न इथला आहे. तो इथच सोडावा लागणार आहे", असे शरद पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु बैठकीचा अजेंडा काय, यावर सरकारने बाजू न मांडल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर महायुती राज्य सरकारने जोरदार टीका केली. मनोज जरांगे यांनी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

या घडामोडीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोघा नेत्यांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली. यानंतर शरद पवार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात काय भूमिका राहणार यावर भाष्य केले. आमचा पक्ष आणि आमची भूमिका मराठा आरक्षणाला सुसंगत असून, या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्यांना एकत्र बोलावून घेत हा गुंता सोडवावा लागेल, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT