sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

शरद पवार म्हणतात आमचं ठरलंय! आता भाजपने दिवस मोजावेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य चालावे, असे तिन्ही पक्षांना वाटते.

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महाविकास आघाडीचे सरकारचा लवकरच करेक्ट कार्यक्रम करणार असे आव्हान भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने देत असल्याचे दिसून येते. पण याच आव्हानाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) आमचं ठरलंय, आता त्यांनी दिवस मोजावेत असं म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक दौर्‍यावर आलेल्या पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, प्रत्येकात गुण-दोष असतात. पण शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जुळवून घेतले आहे आणि त्यानुसार पुढे जाण्याचे आमचे ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य चालावे, असे तिन्ही पक्षांना वाटते. त्यामुळे सरकार आज जाईल, उद्या जाईल अशा पहिल्या दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चा पुढचे पाच वर्षे अशाच सुरू राहणार आहेत, त्यांनी फक्त दिवस मोजावेत असा टोलाही पवार यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.

इंदिरा गांधीविरोधात पर्याय उभा राहिला, मोदींविरोधातही राहिल

केंद्रात विरोधकांमध्ये सक्षम पर्याय नाही का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, कोणत्या नेत्याला पर्याय नाही, अशी स्थिती लोकशाहीत असूच शकत नाही. पर्याय उपलब्ध असतो. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा लोक त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहतात. आताही देश चालवण्याची क्षमता असलेले विरोधकांमध्ये अनेक लोक आहेत. आपल्याला त्याची अजिबात चिंता वाटत नाही. लोकच पर्याय देतील.

१९७५ ते १०७७ या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींविरोधातही देशात सक्षम नेता कोणी नव्हता. पण निवडणुका पार पडल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्याआधी त्यांनी नेतृत्व करावे, असा विचारही कोणाच्या डोक्यात नव्हता. मात्र जयप्रकाश नारायण यांनी आवाहन केले आणि संपुर्ण देश त्यांच्या मागे उभा राहिला. तेव्हा कोणी एक व्यक्ती नव्हती, अनेक लोक होते. शेवटी जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा लोकांमधून व्यक्ती पुढे येते किंवा लोक स्वत:च त्या व्यक्तीला पुढे करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT