Sharad Pawar
Sharad Pawar  
महाराष्ट्र

शरद पवार वाढदिवशी भेटणार नाहीत... राष्ट्रवादीकडून व्हर्च्युअल रॅली..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार येत्या १२ डिसेंबरला ८१ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संसर्गामुळे यावर्षी शरद पवार (Sharad Pawar) व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत, ही माहिती देतानात त्यांनी आपल्याला भेटण्यासाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

यावेळी बोलताना जयंंत पाटील म्हणाले की, ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर कोरोना नियमांचे पालन करुन व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार (१२ डिसेंबर) रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारी ही व्हर्च्युअल रॅलीचे पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचेही जयंंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

तसेच, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असतो. यावर्षीही पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यार्थी संघटनेला 'महाराष्ट्र युथ कार्निवल' असा आगामी काळासाठी विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाची सुरुवात १४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाची फादर बॉडी, फ्रंटल व सेलच्या विभागामार्फत सभासद नोंदणी कार्यक्रम, आरोग्य, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, याशिवाय कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT