Eknath Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election : शिंदेंची शिवसेना भाजपच्याही एक पाऊल पुढे; 'मिशन 48'साठी 'शिवसंकल्प'

Jagdish Pansare

Marathwada Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एक वेगळीच स्पर्धा लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मिशन-45 घेऊन दौरे करीत आहेत. पण दीड वर्षापूर्वीच सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने त्यांच्याही एक पाऊल पुढे टाकत चक्क राज्यातील सर्वच लोकसभेच्या जागा जिंकण्याचा शिवसंकल्प केला आहे.

आमदार अपात्रतेवर विधासभाध्यक्षांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आपल्या नियोजित मेळाव्यासाठी हिंगोलीत दाखल झाले होते. कार्यकर्ता व शिवसंकल्प मेळाव्याला हजेरी लावत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभाध्यक्षांकडून येणारा निकाल आपल्याच बाजूने लागणार, हेच अधोरेखित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हिंगोली येथील शिवसंकल्प मेळाव्यासाठी व्यासपीठाच्या मागे लावलेल्या बॅनरकडे सगळ्यांचे लक्ष जात होते. याचे कारण म्हणजे यावर मिशन 48 चा शिवसंकल्प हाती घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. यावरून शिंदेची शिवसेना ही भाजपच्याही (bjp) तीन पावले पुढे असल्याची चर्चा यानिमित्ताने होताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणून भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवणार आहेत.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात मिशन-45 हाती घेत भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत. अर्थात यामध्ये त्यांना शिवसेना, राष्ट्रवादीचीही साथ मिळणार आहे. परंतु शिवसेनेने मात्र विरोधकांना महाराष्ट्रात लोकसभेची एकही जागा जिंकू द्यायची नाही, असा निर्धार करीत थेट मिशन 48 चा शिवसंकल्प केला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा आत्मविश्वास आहे, की अतिउत्साह अशी चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

दरम्यान, हिंगोली येथे शिवसंकल्प अभियानासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाषणात त्यांनी आपण दीड वर्षापूर्वी पाऊल उचललं नसतं तर गहाण ठेवलेल्या शिवसेनेची सुटका झाली नसती, असे सांगत शिंदे यांनी आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

आमदार बांगर, खासदार हेमंत पाटील यांची मला भक्कम साथ मिळाली. येणाऱ्या निवडणुकीत जेव्हा उभे राहतील, तेव्हा समोरच्या उमेदवाराचे डिपाॅझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT