rahul narweakar, asim sarode  Sarkarnama
महाराष्ट्र

Supreme Court hearing : राहुल नार्वेकरांना शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? कोर्टात सुनावणी सुरू असतानाच ठाकरेंच्या वकिलाचा हल्लाबोल

Shiv Sena case Supreme Court hearing News : सुप्रीम कोर्टात गेल्या दोन आठवड्यापासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सुनावणी सुरू आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर आज सातव्या दिवशी सुनावणी पार पडणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. त्यातच या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठे विधान केले होते. ‘मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत असून, त्यात कोणताही बदल होईल असे मला वाटत नाही. त्या विधानाला प्रत्युत्तर देताना ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी नार्वेकर यांना शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? अशा शब्दांत ट्विट करून जोरदार पलटवार केला.

सुप्रीम कोर्टात गेल्या दोन आठवड्यापासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सुनावणी सुरू आहे. त्यातच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विधानाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. ‘मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत असून, त्यात कोणताही बदल होईल, असे मला वाटत नाही. मी घेतलेली भूमिका, आणि दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहून घेतला आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

नार्वेकर यांच्या या विधानानंतर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी थेट नार्वेकर यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ‘राहुल नार्वेकर स्वतः वकील आहेत. त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांना ज्या वकिलांचा सल्ला घेऊन यायचे आहे त्यांनी यावे. महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात माझ्याशी कायदेशीर जाहीर वादविवाद ठेवावा आणि त्यांचे म्हणणे लोकांना पटवून द्यावे.' असे ट्विट सरोदे यांनी केले आहे.

‘राहुल नार्वेकर यांना शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय संपूर्णपणे बेकायदेशीर आहे, हे मी वारंवार सांगतोय आणि सांगत राहील. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह इतर चार न्यायाधीशांनी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनेक पानांवर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या बेकायदेशीर व घटनाबाहय निर्णयांचे उल्लेख आहेत. कपिल सिब्बल केवळ कुणा पक्षकारांची बाजू मांडत नाहीयेत तर संविधान व लोकशाहीची बाजू मांडत आहेत. पण संविधानाशी बेईमानी करून या देशाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या सत्तालोलुप लोकांना ते समजून घेताच येणार नाही.

राहुल नार्वेकर स्वतः वकील आहेत. त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांना ज्या वकिलांचा सल्ला घेऊन यायचे आहे त्यांनी यावे, महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात माझ्याशी कायदेशीर जाहीर वादविवाद ठेवावा आणि त्यांचे म्हणणे लोकांना पटवून द्यावे. अहो नार्वेकर साहेब किती नुकसान करणार लोकशाही यंत्रणांचे ? आता बस्स !’ असे ट्विट सरोदे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT