kapil sibbal  Sarkarnama
महाराष्ट्र

Kapil Sibal Materstroke : कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात सुपर 'माइंड गेम'! पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आणला समोर; एकनाथ शिंदेंच्या त्या भूमिकेवरही ठेवलं बोट

Kapil Sibal on Fadnavis Ajit Pawar Oath News : कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सुरुवातीपासूनच प्रभावीपणे मांडणी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे

Sachin Waghmare

New Dehli News : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हावरची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वकिलाने बाजू मांडली आहे. दोन्ही बाजूनी युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. बुधवारी सुनावणीवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल हे रिजॉइंडर देत आहेत. त्यावेळी सिब्बल यांनी दोन मुद्दे सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल मांडत 'माइंड गेम' सुरु केला आहे. त्यांनी 2019 मध्ये झालेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून एकनाथ शिंदेंना घेरले आहे. त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून घेरले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीत ट्विस्ट पाहवयास मिळत आहे.

कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सुरुवातीपासूनच प्रभावीपणे मांडणी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. मात्र, मधल्या काळात शिंदेंच्या शिवसेनेकडून काही आरोप खोडून काढले असले तरी शेवटच्या क्षणी ऐन महत्त्वाचे मुद्दे मांडत सिब्बल यांनी ट्विस्ट आणला आहे. युक्तिवाद करताना सिब्बल म्हणाले,'2019 मध्ये भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, त्यावेळी भाजपने सरकार स्थापनेचे निमंत्रण नाकारले होते. त्यावेळी तर शिवसेना आणि भाजपची निवडणुकी आधीच युती होती. त्यानंतर कोणाचेही सरकार बनल नाही, त्यावेळी राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथ घेतली. त्यावेळी तरी निवडणुकीआधी त्या दोघांची कुठे युती होती? असा सवाल यावेळी सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती, परंतु त्यानंतर जनादेश नाकारून उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली, त्यांची आधी युती नव्हती, असा युक्तिवाद शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. त्याला आता कपिल सिब्बल यांनी उत्तर दिले आहे.

पुढे बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढे महाविकास आघाडी सरकार आले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंसह दादा भुसे, गुलाबराव पाटील हे मंत्रिपदावर होते. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून अचानक त्यांना ही आघाडी चुकीची वाटायला लागली. त्या दिवसापर्यंत कोणाचाच विरोध नव्हता, कोणालाच काही चुकीचे वाटत नव्हते. जी मंडळी आज विचारधारा वगैरे सांगत आहेत, निवडणूकपूर्व युती संगत आहेत, त्यांची राष्ट्रवादीसोबत तशी युती होती का? असा सवालही यावेळी सिब्बल यांनी उपस्थित केला.

विधिमंडळ पक्षातील बहुमत हे राजकीय पक्षात कसे शिफ्ट होऊ शकते? निवडून आलेले विधिमंडळ सदस्य हे राजकीय पक्षाच्या अंतर्गत राहतील. विधिमंडळातील बहुमत राजकीय पक्ष ठरू शकत नाही आणि त्यापेक्षा मोठेही अजिबात ठरू शकत नाही, असा युक्तिवादही यावेळी सिब्बल यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT