Shiv Sena symbol dispute Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena Symbol Case : शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगाला चूक भोवणार? 'त्या' एका नोटीसमुळे शिंदेंची अडचण वाढणार

Supreme Court hearing News: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

Sachin Waghmare

Shiv Sena symbol dispute latest update: सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या धनुष्यबाण चिन्ह अन् पक्षाबाबत सुनावणीचा पाचवा दिवस आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

सिब्बल यांच्या युक्तिवादाने आता घेरले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नोटीस दिल्याशिवाय निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, आणि आम्हाला तशी कोणतीही नोटीस दिली गेली नाही, असा दावा सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे आता एका नोटीसमुळे शिंदेंच्या अडचणी वाढणार आहे.

पाचव्या दिवशी सुनावणी करीत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. जनता दलाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही, असा दावा करताना सिब्बल यांनी एखादा पक्ष काही करत नसेल तर आयोग फक्त नोंदणी रद्द करू शकतो, पक्षच कोणाला उचलून देऊ शकत नाही असा युक्तिवादही केला आहे. निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला, असेही यावेळी सिब्बल यांनी म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेवर युक्तिवाद केला. सिब्बल यांनी यापूर्वी पक्षाची घटना, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरकावर जोरदार युक्तिवाद केला होता. गुरुवारच्या सुनावणीवेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

केवळ संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणे बेकायदेशीर होते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. आयोगाने पक्षाची घटना किंवा माहितीची शहानिशा न करता निर्णय घेतल्याचे त्यांनी कोर्टासमोर मांडले.

त्यांनी निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आयोगाला पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार पॅरा १५ अंतर्गत नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घेतला नाही म्हणत अध्यक्षांवर कपिल सिब्बल यांनी खापर फोडले. नोटीसला शिंदेंच्या आमदारांनी उत्तर दिले. पण पुढे काय झाले? असाही मोठा प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात उपस्थित करण्यात आला.

दोन्ही मुद्दे अध्यक्ष पाहू शकत नसल्याचेही कपिल सिब्बल यांनी म्हटले. जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात केला जात आहे. ज्या घटना घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली, हे स्पष्ट असल्याचेही कपिल सिब्बल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT