Security cover enhanced for six MPs following intelligence inputs regarding potential threats. sarkarnama
महाराष्ट्र

MP Threat : ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना धोका! गुप्तवार्ता विभागाच्या माहितीने खळबळ! पोलिस आयुक्तांना पाठवले मेसेज!

Intelligence Department : गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या निर्देशानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हा ऑपरेशन तुडवाचा इफेक्ट आहे.

Roshan More

Shiv Sena UBT Split : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज बोलावलेल्या बैठकीला सहा खासदार उपस्थित राहिले नाहीत. या फुटलेल्या खासदारांच्या उल्लेख संजय राऊत यांनी गद्दार म्हणून केला आहे. त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली आहे. फुटलेल्या खासदारांना दिसेल तिथे तुडवा, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, फुटलेल्या सहाही खासदारांना धोका असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाकडून (Intelligence Department) जारी करण्यात आलेल्या मेसेजमध्ये देण्यात आली आहे.हा मेसेज खासदारांचे निवास्थान, मतदारसंघात असलेल्या पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक तसेच गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

वेगळा गट स्थापन केलेल्या खासदार संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव( परभणी),संजय दिना पाटील (उत्तर-पूर्व मुंबई), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली),ओमराजे निंबाळकर ( धाराशिव),भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी) या खासदारांना गुप्तवार्ता विभागाकडून स्थानिक पातळीवर Y+ दर्जाच्या सुरक्षेसमान बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा संदेश देण्यात आले आहेत.

ऑपरेशन तुडवा इफेक्ट

गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या निर्देशानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हा ऑपरेशन तुडवाचा इफेक्ट आहे. दरम्यान,राऊत यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये वापरलेल्या भाषेवर रावसाहेब दानवे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष म्हणजे वेड्यांचा बाजार आहे. त्यांचे गद्दार,बेईमान,भ्रष्टाचारी लोकांवर प्रेम आहे हे दिसते!गद्दारांबद्दल मी वापरलेली भाषा रावसाहेब दानवे याना मान्य नाही,जे दानवे शेतकऱ्यांना चोर,साले,बदमाश असे उघड पणे म्हणतात भाजपला गद्दार चालतात पण प्रामाणिक शेतकरी बेईमान वाटतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT