aditya thackeray
aditya thackeray sarkarnama
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६ वी जयंती. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी आपले आजोबा बाळासाहेब (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करीत समाजमाध्यमांवर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेबासोबतचा लहानपणीचा फोटो आदित्य ठाकरे यांनी शेअर केला आहे.

या फोटोमध्ये आदित्य ठाकरे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तर त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नातवाच्या पाठी उभे आहेत. आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांची अनोखं अभिवादन केलं आहे. कुणी स्टोन आर्ट काढलं तर कुणी आपट्याच्या पानावर चित्र साकारलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जयंती निमित्त चित्रकार सुमन दाभोलकर यांनी बाळासाहेबांचे स्टोन आर्ट साकारलं आहे. दगडाला आकार न देता, काटछाट न करता दगडावर चित्र साकारण्यात तसेच आव्हानात्मक चित्र साकारण्यात सुमन दाभोलकर यांचा हातखंडा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील गव्हाणे गावचे युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी आपट्याच्या पानावर 2 इंचाचं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याचं चित्र काढलं आहे. आपट्याच्या पानावर अर्ध्या तासात अक्षय मेस्त्री याने हे चित्र साकारलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, ''आजही आम्हाला वाटतं की ते आमच्या आसपास आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला राजकीय दिशा दिली. बाळासाहेब होते तोपर्यंत कोणाचीही पोपटपंच्छी चालली नसती. बाळासाहेब असते तर बऱ्याच या गोष्टी झाल्या नसत्या विशेषतः जी विरोधी पक्षांमध्ये आज-काल कावकाव चिवचिव चालू आहे जी तडफड सुरू आहेत ती बाळासाहेबांच्या अस्तित्व आणि थंड पडली असती.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT