Eknath shinde cm ceremony, devendra fadnavis And Shahaji Bapu Patil sarkarnama
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil : 'माझी रास शिवसेनेची, मी कसा काँग्रेसकडे गेलो...' शहाजीबापू पाटलांच्या वक्तव्यामुळे खळबळ

Shahaji Bapu Patil on Eknath Shinde And Shivsena : 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल...' या डायलॉगमुळे अख्या राज्यात फेमस झालेले शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी आणखी खळबळ जनक वक्तव्य केलं आहे.

Aslam Shanedivan

Solapur News : राज्यात महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. पण आजही शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत किंवा तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे सतत शिंदेंसह शिवसेनेचे नेते बोलसत असतात. दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी, मी निवडून यायला हवं होतं. मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एखच खळबळ उडालेली आहे.

शहाजीबापू पाटील यांनी येथील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं असून त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाबद्दल हे विधान केले. यावेळी त्यांनी, जुनी उदाहरणे देत त्यांनी कारणही सांगितले. याचवेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दलही खदखद व्यक्त केली.

यावेळी त्यांनी, माझी रास शिवसेनेची असून मी पूर्वी काँग्रेसमध्ये कसा गेलो याचे कोडे अद्यापही समजलेलं नाही. पण मी हे ठामपणे सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही. 1995 मध्ये मी निवडून आलो, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. 2019 ला निवडून आलो, तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण आताही मी निवडून आलो असतो तर 100 टक्के राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले असते, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

तसेच शहाजीबापू पाटील यांनी, गंगेचा उगम पवित्र आहे. कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झाला आहे. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, कारण याची सुरूवात बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे. पण ती उद्धव ठाकरे यांच्या काळात मागे पडली. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात पक्षाची सूत्रं दुसऱ्याकडे गेली त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी आपली ही लढाई असून तुम्ही आम्ही जसे मावळे आहोत. तसेच मावळे त्यावेळी पानिपतला जाणारे होते. राज्याच्या कानकोपऱ्यात लोक म्हणतात, एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील दोन वर्षात शिंदेंनी खूप कष्ट घेतले. त्यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती असा महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल लागला. पवार साहेबांसारख्या माणसाचे केवळ 10 लोक निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती, असाही टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT