Maratha Reservation  sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation: आरक्षणावरुन महायुतीची डोकेदुखी वाढणार; एकनाथ शिंदेंचा आमदार सरकारमधून बाहेर पडणार

Shiv Sena MLA Amshya Padavi opposing Maratha reservation: हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशाच बंजारा समाजाने आपल्यालाही हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावरुन शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी महायुती सरकारलाच आव्हान दिले आहे.

Mangesh Mahale

📝 Summary

  1. शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला.

  2. पाडवी यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की अशा निर्णयावर ते सरकारमधून बाहेर पडतील.

  3. काँग्रेस नेते ॲड. पद्माकर वळवी यांनीही बंजारा समाजाच्या मागणीला कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट केले.

सागर निकवाडे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु असताना सत्ताधारी आमदारानेच सरकारला इशारा दिला आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशाच बंजारा समाजाने आपल्यालाही हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावरुन शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी महायुती सरकारलाच आव्हान दिले आहे.

"बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याची मागणी सुरु आहे. यावर आमश्या पाडवी यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण दिले तर मी सरकारमधून बाहेर पडेल," अशा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला आहे.

आदिवासींमध्ये बंजारा आणि धनगर समाजाला घुसू देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले, आमश्या पाडवी यांच्या या भूमिकेमुळे आरक्षणावरुन महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटात जन्म घ्यावा लागतो, असे ते म्हणाले. बंजारा, धनगर समाजाने कितीही आंदोलन केले तरी आम्ही त्यांना आदिवासींमध्ये येऊ देणार नाहीत, असे ठामपणे त्यांनी सांगितले. हैदराबाद गॅझेटनुसार कुणालाही आदिवासींच्या आरक्षणामध्ये घूसू देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला आहे.

माजी मंत्री, काँग्रेसचे नेते ॲड. पद्माकर वळवी यांनीही बंजारा समाजाच्या आदिवासीतील आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "बंजारा समाज श्रीमंत समाज आहे. बंजारा समाजातून वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले आहेत. अनेक मंत्री देखील बंजारा समाजातून झाले आहेत, तरीही तुम्ही आदिवासींच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करण्याचे प्रयत्न करत आहात, कायद्याप्रमाणे ही मागणी कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, असे वळवी यांनी सांगितले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंजारा समाजाने राज्य सरकारला ब्लॅकमेल करणं बंद करा, असे वळवी यांनी सुनावले.

आदिवासी समाजातून धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली होती, त्यावेळेस आम्ही समाजाच्या वतीने कायद्याची लढाई लढलो आणि जिंकलो. अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी काही निकष असतात हे निकष आम्ही ठरवले नसून राज्यघटनेने निकष ठरवले आहेत. या निकषात बंजारा समाज बसत नसल्यामुळे आजपर्यंत समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण यादीत समावेश करण्यात आलेले नाही. बंजारा समाजाला विमुक्त जाती ‛अ’ मध्ये 3% आरक्षण असून आणि विमुक्त भटक्या जमाती अ.ब.क.ड. या चार घटक मिळून बंजारा समाजाला 11 टक्के आरक्षण आहे, असे वळवी म्हणाले.

बंजारा समाज राजकीय आरक्षण घेण्याच्या वेळेस ओबीसीच्या यादीतून आरक्षण घेतात, शैक्षणिक, नोकरी आणि इतर 11 टक्के आरक्षण घेतात. तुम्हाला मिळालेल्या आरक्षणाच्या मर्यादा वाढवून मागा, सरकारकडून बजेट व योजना मागा. वेळ पडल्यास आम्ही समाजासाठी हायकोर्टात जाणार, रस्त्यावर देखील उतरण्याची आमची तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला.

 FAQs

Q1. आमश्या पाडवी यांनी कोणत्या समाजाच्या आरक्षणाला विरोध केला?
A1. त्यांनी बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्यास विरोध केला.

Q2. आमश्या पाडवी यांनी सरकारला कोणता इशारा दिला?
A2. जर सरकारने आरक्षण दिले तर ते सरकारमधून बाहेर पडतील असा इशारा त्यांनी दिला.

Q3. काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी काय भूमिका घेतली?
A3. बंजारा समाज श्रीमंत असल्याने त्यांचा अनुसूचित जमातींत समावेश अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले.

Q4. सध्या बंजारा समाजाला किती टक्के आरक्षण आहे?
A4. बंजारा समाजाला विमुक्त जाती ‘अ’ अंतर्गत 3% आणि भटक्या जमातीसह मिळून 11% आरक्षण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT