Shrikant Shinde News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक घेतल्याचे वृत्त समोर आले होते. ठाकरेंच्या नऊ पैकी आठ खासदार या बैठकीला उपस्थित राहिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ऑपरेशन टायगर सक्रीय झाल्याची चर्चा होती. दरम्यान, ठाकरेंच्या खासदारांनी या बैठकीचे वृत्त फेटाळले आहे. आता एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली आहे.
'साम टिव्ही'च्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, या बातमीत तथ्य नाही कुठलीही बैठक झाली नाही.वर्षभरापासून ऑपरेशन टायगरबाबत केवळ अफवा आहेत.'
शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील अशी कोणती बैठक झाली नाही. या क्षणाला आम्हाला वाटत नाही की त्यांच्यातले खासदार फोडून आमच्यासोबत घ्यावेत. मात्र त्यांच्यात काही नाराजी असेल तर त्याविषयी आम्हाला माहिती नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतूनच अशा बातम्या पसरवल्या जात आहे.
अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदेंसोबतच्य बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, विकली जाणारी औलाद आमची नाही. आम्ही मातोश्रीसोबतच आहोत. मला उभा चिरला तरी ठाकरेंसोबतच राहणार.
संजय राऊत म्हणाले, सतत ऑपरेशन होत नसतं. सतत ऑपरेशन होत असेल तर डेडबाॅडी होते. शिंदेंच्या शिवसेनेची देवेंद्र फडणवीसांनी डेडबाॅडी केली आहे. बैठकीच्या संदर्भात बातमीमधील खासदाराची नाव वाचली अन् मला हासूच आले. हे उद्या माझे आणि आदित्य ठाकरेसाहेबांचे देखील नाव टाकतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.