बनावट कागदपत्र प्रकरण सादर करुन सनदी अधिकारी झालेल्या पूजा खेडकर प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रात आणखी एक सनदी अधिकारी वादात सापडला आहे. त्यांचे नाव आहे सचिन ओंबासे. ते सध्या सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत आहेत.
केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांचे इतर मागासवर्गीय - नॉन-क्रिमी लेयर (ओबीसी-एनसीएल) प्रमाणपत्राची सत्यता पडताळून पाहण्यास सांगितले आहे, अशाच प्रकारचे पंधरा पत्र विविध राज्यात पाठवण्यात आले आहे.
नॅान क्रिमिलियर्स प्रमाणपत्राबाबत राज्य सचिवांना आदेश देण्यात आला आहे. तुमच्या राज्यातील सनदी अधिकारी सचिन ओंबासे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सर्व कागदपत्रे तपासायचे आहे, ते संकलित करा, असा आदेश देण्यात आला आहे.
2014 मध्ये नागरी सेवा परीक्षा देताना ओम्बासे यांनी बनावट OBC-NCL प्रमाणपत्र वापरल्याली पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केंद्र सरकारचे अप्पर सचिव अंशुमन मिश्रा यांना तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीसंदर्भात सौनिक यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो पाठवला आहे.
खोटी माहिती पुरवुन बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा दावा विजय कुंभार यांनी केला आहे, नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी सचिन ओंबासे यांनी खोटी कागदपत्र सादर केली, त्याआधारे त्यांनी प्रमाणपत्र मिळवले असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
परीक्षा देण्यासाठी ओंबासेंनी नॉन-क्रिमी लेयरया गैरफायदा घेतला का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. याबाबतचे पत्र आपल्याला मिळाल्याचे राज्याच्या सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले.
ओंबासे यांनी नागरी सेवा परीक्षा सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण होण्यासाठी चार अयशस्वी प्रयत्न केले होते, त्यानंतर त्यांनी अधिक प्रयत्नांसाठी पात्र होण्यासाठी नॉन-क्रिमी लेयर श्रेणीचे ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त केले. अखेरीस पाचव्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली, असे कुंभार यांनी म्हटले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील माजी आयएएस प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर नागरी सेवा परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी-एनसीएल प्रमाणपत्रे खोटे केल्याचा आरोप झाल्यानंतर एक वर्षानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.