Show Cause Notices to ST Workers

 

sarkarnama

महाराष्ट्र

ST strike : ५५ हजार जणांना कारणे दाखवा नोटीस

बडतर्फ आणि निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर लवकरच सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या चालकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी सात नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटीची वाहतूक आठ नोव्हेंबरपासून बंद ( ST strike) आहे. हा संप सुरू होऊन दोन महिन्‍यांचा कालावधी उलटत आहे.

एसटी प्रशासनाकडून संपात सहभागी अजूनही संपावर आहेत. तर काही कर्मचाऱ्यांनी एसटीकडून देण्यात आलेल्या संधी दरम्यान कर्तव्यावर हजर झाले आहेत. संपात सामिल झालेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.

एसटी महामंडळातील तब्बल 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना ( ST strike) कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. बडतर्फ आणि निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर लवकरच सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या चालकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तीन वेळा सुनावणीसाठीलाही हजर राहण्याच्या सूचना असतात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. (Show Cause Notices to ST Workers)

औरंगाबाद विभागात निलंबित करण्यात आलेल्या आणखी १२ एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई सुरू असताना, मंगळवारी ५० कर्मचारी कामावर रूजू झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. एसटीचे ५० कर्मचारी कामावर रूजू तर १२ जणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

एसटीच्या विलिनीकरणासाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांच्या विरोधात निलंबनासह बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

आतापर्यंत संप सोडून एसटीच्या कर्तव्यावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८५० वर पोहोचली आहे. या कर्मचाऱ्यांमुळे मंगळवारी तब्बल १०८ बसद्वारे ३३७ फेऱ्या करण्यात आल्याने पाच हजार ८९५ प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाचा लाभ घेतला. पुणे मार्गावर १५ तर, नाशिक मार्गावर सात शिवशाही बस चालवण्यात आल्या आहेत. या सुरू असलेल्या एसटी बसमधुन ५८९५ प्रवाशांनी प्रवास केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT