ST  Sarkarnama
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, राज्यातील २५० पैकी २२० आगार बंद

या सगळ्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या सुट्टीवरुन परत निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु असलेले दिसून येत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटी कर्मचाऱ्याचा संप आता निर्णायक वळणावर पोहचला असून तो आता चिघळण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्मचाऱ्यांनी आर-पारची भूमिका घेत हा संप मागे घेतलेला नाही. परिणामी आज राज्यातील २५० पैकी जवळपास २२० आगार बंद आहेत. विदर्भातील अमरावती, बुलढाणा मराठवाड्यातील उस्मनाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड अशा मोठ्या आगारांमधून एकही एसटी बाहेर पडलेली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या सुट्टीवरुन परत निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु असलेले दिसून येत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकरला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी २९ ऑक्टोबरला मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. यात एसटी कामगारांना २८ टक्के महागाई भत्ता देणे आणि वाढीव घरभाडे भत्ता देणे अशा मान्य काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या मात्र त्यानंतरही वार्षिक वेतनवाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण व्हावे या मागणीवर कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. तसेच जो पर्यंत या मागण्या मान्य होच नाहीत तो पर्यंत संप सुरुच राहणार असल्याची आर-पारची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

प्रवाशांचे होत असलेले हाल पाहून मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचे घोषित केले. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी हा संप सुरुच ठेवला आहे. उच्च न्यायालयात आज सोमवारी याबाबत सुनावणी होणार आहे. तसेच तोडगा काढण्यासाठी आज एकूण १७ कर्मचारी संघटनांची मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळेच आज मुंबईत नेमके काय निर्णय होतात याकडे एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT