Agriculture Education Jobs : राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये 11 हजार 350 रिक्त पदांचा आकृतीबंद शिल्लक असून ही सर्व पदे पुढील अधिवेशनापूर्वी भरली जातील, असे ठोस आश्वासन कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले.
विधानपरिषदेचे सदस्य सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधी उपस्थित केली होती.
सतीश चव्हाण यांनी मागील दहा वर्षांत कृषी (Agricultural) विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतरांची भरती झालेली नाही. यामुळे ही सर्व पदे मार्च 2026 पर्यंत भरणार का, असा सवाल केला. तसेच ही पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश मंडळाच्या अध्यक्षपदांचा कार्यभार अध्यक्ष मिळेपर्यंत इतरांना द्यावी अशी मागणी केली.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावर पदांसंदर्भात मी स्वत: आढावा घेऊन त्याचा वित्त विभागाकडेही पाठपुरावा करत आहे. यामुळे पुढील 20 दिवसांत वित्त विभागाकडून यासाठीची रखडलेली कार्यवाही पूर्ण करून सर्व जागा भरण्यासाठी प्रक्रिया केली जाईल आणि पुढील अधिवेशनात (Assembly) या विषयावर प्रश्न उपस्थित करण्याची गरज पडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील चारही विद्यापीठांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या रिक्त पदांविषयी अधिक माहिती देताना मंत्री भरणे सध्या एमसीआरचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना सेवा प्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार दिला जाईल. कृषी विद्यापीठातील आकृतीबंधातील सगळी 11 हजार 350 पदे भरली जातील असे आश्वासन दिले.
दरम्यान, विधानपरिषदेच्या तारांकित प्रश्नाच्या यादीत राज्यातील चार विद्यापीठातील 7 हजार 199 शिक्षक आणि शिक्षकेतरांची पदे रिक्त असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अकोला कृषी विद्यापीठात 3538 पदे असून त्यापैकी 2884 पदे रिक्त आहेत. चारही विद्यापीठांतील पदे मार्चपर्यंत भरली जातील. सुमारे 11350 पदांचा आकृतिबंध त्याकरिता मंजूर केला जाईल, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.