Sudhir Mungantiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar News :'चौथीत 50 वेळा नापास होणारा, 'Phd'च्या विद्यार्थ्यास ज्ञान शिकवणार असेल, तर ...' ; मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला!

Sudhir Mungantiwar attack on Opponent : परभणीच्या घटनेवरून विरोधकांनी कायदा, सुव्यवस्थेवरून टीका सुरू केली तर मुनगंटीवारांनी त्यांची कुंडलीच काढण्याचा दिला इशारा, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Sudhir Mungantiwar on Parbhani Violence : परभणीच्या हिंसाचाराच्या घटनेवरून विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली जात आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'विरोधी पक्ष काय म्हणतात मला माहीत नाही. त्यांच्या कार्यकाळातही घडलेली हिंगणघाटची घटना आठवते, अमरावतीमधील दंगल, त्यांच्या कार्यकाळातील बॉम्बस्फोट अन् 26/11चा हल्ला देखील आजही आठवतो. तर त्यांना टिप्पणी करण्याचा अधिकारच नाही.'

याशिवाय 'चौथीत पन्नासवेळा नापास होणारा पीचएडीच्या विद्यार्थ्यास ज्ञान शिकवणार असेल, तर ही न समजण्यासारखी बाब आहे. त्यांच्या कार्यकाळात काय झालं याची जर श्वेतपत्रिका काढली, तर ती श्वेतपत्रिका राहणार नाही. ती रक्ताच्या लाल डांगांनी भरलेली पत्रिका राहील. तर त्यांनी ज्ञान पाजळण्याची गरज नाही.' असा टोलाही सुधीर मुनगंटीवारांनी(Sudhir Mungantiwar) यावेळी लगावला.

'परंतु, हे संविधानाचं अमृतमोहत्सवी वर्ष आहे आणि परभणीची जी घटना आहे, त्यामध्ये ज्या कोणी व्यक्तिने हे केलं आहे त्यास कडक शिक्षा दिली गेली पाहीजे आणि आमची जनतेला हे आवाहन आहे, कारण संविधानास तुम्हीही मानता, आम्ही देखील मानतो अन् परभणीची जनताही मानते. आपण असं काही काम करू नये ज्यामुळे निरपराध व्यक्तिला त्रास सहन करावा लागेल. त्यांचा काय दोष आहे?' असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

तसेच, 'कुणी एक माथेफिरू व्यक्ति एखादा गुन्हा करेल, तर त्यात सर्वसामान्य रिक्षा चालकाचा, गाडी चालवणाऱ्याचा काय गुन्हा आहे? आपण संविधानाचे रक्षक, संविधानाच्या सन्माबाबत बोलतो तर आपल्या हातूनही सन्माची कृती झाली पाहीजे. संविधानस ठेच पोहचली नाही पाहीजे.' असंते मुनगंटीवार म्हणाले.

याचबरोबर 'विरोधकांना विरोधकांचं काम व्यवस्थितपणे करता येत नाही. ते नीट सत्ताही चालवू शकले नाही आणि त्यांना विरोधक म्हणून ठीक काम करता येत नाही. आम्हाला बोलत होते की लाडकी बहीण योजना चांगली नाही आणि मग स्वत:च निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ३ हजार रुपये देणार असं सांगितलं. केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून ते करत आहेत. त्यांच्याकडे कोणताही विचार नाही. त्यामुळेच मला वाटतं जनतेनेही आता त्यांचा हिशोब नीट केला आहे, असंच जर वागत राहिले तर यापेक्षाही ठीक हिशोब होईल.' असा इशाराही मुनगंटीवारांनी यावेळी विरोधकांना दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT