Deputy CM Sunetra Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan Parishad Elechtion : राष्ट्रवादीची एक नाही 3 जागांची डिमांड : अमित शाहंच्या भेटीतही सुनेत्रा पवारांची बार्गेनिंग पॉवर कायम

MlC Elechtion News : यावेळी कांदा, साखर प्रश्नाबाबत येत्या 10 दिवसात त्याबाबत केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले असल्याची माहिती बैठकींनंतर पत्रकाराशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

सरकारनामा ब्युरो

New Dehli News : राज्यातील कांदा व साखरप्रश्नी दिल्लीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहांच्या उपस्थित सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक पार पडली. यावेळी कांदा, साखर प्रश्नाबाबत त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसात त्याबाबत केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले असल्याची माहिती बैठकींनंतर पत्रकाराशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत यावेळी चर्चा झाली असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी मोठे विधान केले.

यावेळी राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागाबाबत तीन पक्षात बोलणी झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. महायुतीची जागावाटपाबाबत बोलणी अद्याप सुरु आहे. तीन पक्ष याबाबत एकत्रित चर्चा करीत आहेत. दिल्लीतील बैठकीवेळी आम्ही तीन जागांची मागणी केली असल्याचे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या केबिनमध्ये झालेल्या बैठकीस सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यासोबतच यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार बजरंग सोनवणे हे देखील हजर होते.

दिल्लीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा पार पडली. त्याशिवाय कांद्यावर निर्यात बंदी असल्यास लवकर सोडवू असे आश्वासन यावेळी अमित शाह (Amit Shah) यांनी दिले असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी तीन पक्षात काही जागावरून तिढा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, परभणी-हिंगोली, रत्नागिरी-रायगड-सिंधुदुर्ग या तीन जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा जागांची मागणी केली आहे. त्यामुळे आता या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर जागावाटपाबाबत भाजपकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT