DCM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Government: 'अधिवेशनानंतर 7 दिवसांत अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र, दोन महिन्यानंतरही..'; सुनेत्रा पवार भाजपबद्दल पहिल्यांदाच थेट बोलल्या

NCP Vs BJP: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आजी-माजी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.तसेच प्रमुख नेतेच या बैठकीला उपस्थित होते. मात्र,मुंबईत असूनही वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थखातं त्यांच्याकडे घेतलं होतं. तसेच त्यांनी अधिवेशनात अर्थसंकल्पही सादर केला होता. त्यावेळी भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, वारंवार याबाबत मागणी करुन आणि दोन महिने उलटूनही राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळालेलं नाही. यावरुनच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उघडउघड नाराजी बोलून दाखवल्याचं समोर आलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी(ता.26 मे) मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.आमदारांच्या याच बैठकीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी अर्थखात्यावरून सरकार तसेच भाजपबाबत खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार यांनी भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत शब्द देण्यात आला होता. पण वारंवार विषय काढूनही मुख्यमंत्र्‍यांनी अद्यापही अर्थखात्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आजी-माजी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.तसेच प्रमुख नेतेच या बैठकीला उपस्थित होते. मात्र,मुंबईत असूनही वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

तसेच याच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्यात खटके उडाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांना आणखी हवा मिळाली आहे.

तटकरेंचा वादाचा मुद्दा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादळी बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वादाचा मुद्दा काढला. माझ्यासह प्रफुल पटेलांवर सातत्यानं टीका होत असताना कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नाही, अशी उघड नाराजी तटकरे यांनी बोलून दाखवली. प्रफुल पटेल आणि तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही? अशी विचारणाही तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT