Sunetra Pawar, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे शरद पवारांविषयी ट्विट; म्हणाल्या, पवार साहेबांचे मार्गदर्शन...!

Sharad Pawar guidance quote : मागील काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून त्यावर सातत्याने भाष्य केले जात आहे.

Rajanand More

Sunetra Pawar statement : विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी चार दिवसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर येणार असल्याचे पक्षाचे नेते सांगत आहेत. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू केली होती, असा दावा शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.

राज्यात या राजकीय घडामोडी घडत असतानाच सुनेत्रा पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच शरद पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियातून शरद पवार यांच्या सार्वजनिक आणि संसदीय वाटचालीबाबत त्यांनी भावनिक पोस्ट केली आहे. त्यामध्ये शरद पवार यांचा एक जुना फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे.

काय म्हटलं आहे सुनेत्रा पवारांनी?

सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदरणीय शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. १९६७ मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे.

महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ, हीच त्यांच्या यशाची खरी ताकद असल्याचे सुनेत्रा पवारांनी म्हटले आहे.  

पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो, अशी सदिच्छाही सुनेत्रा पवार यांनीही व्यक्त केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून त्यावर सातत्याने भाष्य केले जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मात्र विलीनीकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला काही माहिती नसल्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT