Sunetra Pawar's statement has triggered political discussions, with party insiders debating its possible target within the NCP leadership. Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवारांच्या टार्गेटवर 'राष्ट्रवादी'तील 'हे' पाच मोठे नेते? 'त्या' वक्तव्यामुळे जोरदार चर्चा

Sunetra Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवारांनी जाहीर इशारा दिला. कठोर निर्णय घेणे मला जड जाणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांचा हा इशारा कोणाला होता याची चर्चा सुरू झाली आहे.

Roshan More

Sunetra Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिना निमित्त सुनेत्रा पवार यांनी जाहीर भाषणातून सज्जड दम भरला. दादांसारखे कठोर निर्णय घेण्यास मला अजिबात जड जाणार नाही. पक्षाची बदनामी सहन करणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा इशारा नेमका कोणाकडे होता, याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच नेत्यांचे नाव न घेता त्यांनी हा इशारा दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ मंत्र्यामध्येच पक्षावरील ताब्यासाठी छुपा संघर्ष असल्याचे बोलले जात आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यात चढाओढ दिसून येते. त्यामुळे या नेत्यांनाच हा इशारा असल्याचे बोलले जात आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांची दोन वादग्रस्त प्रकरणे समोर आली. पक्षाने डॅमेज कंट्रोल करत त्यांचा राजीनामा घेण्याचे टाळले. त्यांना अभय मिळाले असले तरी त्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याची भावना आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा एक प्रकारे झिरवळ यांना देखील हा इशारा असल्याचे मानले जात आहे.

स्थानिक पातळीवरील काही नेते, माजी आमदार हे देखील वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येतात. तर, काही जण वादग्रस्त प्रकरणात देखील अडकले आहेत. पोर्श कार अपघात प्रकरणात चर्चेत आलेले माजी आमदार सुनील टिंगरे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. जाहीरपणे ते काही बोलले नसले तरी त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार विधान परिषद निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या उमेदवाराला आव्हान टिंगरे यांनी दिले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा रोख त्यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

'त्या' नेत्यांनाही सुनावले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत असतात. काही सल्ले देण्याचा प्रयत्न करतात. त्या नेत्यांचे नाव न घेता सुनेत्रा पवारांनी पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही, असा इशारा दिल्याचे बोलले जात आहे. पक्षावर आपली पकड कायम असल्याचे सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणातून दाखवून देत अजितदादांच्या स्टाईलने काम केले जाईल, हे दाखवून दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT