Aniket Tatkare, Sunil Tatkare, Mahendra Thorve Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'सुनील तटकरे कमळाच्या वाटेवर, लवकरच भाजप प्रवेश...', शिंदेंच्या शिलेदाराच्या वक्तव्याने खळबळ

Sunil Tatkare Vs Mahendra Dalvi : अजिदादांचे विश्वासू शिलेदार सुनील तटकरे हे कमळाच्या वाटेवर असल्याचा धक्कादायक दावा एकनाथ शिंदेंच्या आमदाराने केला आहे.

Roshan More

Raigad Politics : रायगडच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असे चित्र आहे. तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. मात्र, ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचा धक्कादायक दावा शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.

दळवी म्हणाले, 'तटकरे हे कुणाशी एकनिष्ठ नाहीत. ज्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं त्यालाच त्यांनी फसवलं. त्यांच आयुष्य चिटींगमध्ये गेलंय. आता त्यांची कमळाच्या दिशेने वाटचाल सुरू असून लवकरच ते भाजपमध्ये जातील.'

पुढे बोलताना दळवी म्हणाले, 'सुनील तटकरेंनी रोह्याच नाव बदनाम केलं आहे. घोटाळेबाज म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. आता रोह्याचे नाव बदनाम होण्याआधीच त्यांना रोह्यातून हद्दपार करा. ते चिंटींग करणारे आहेत. मी त्यांच्यावर जे आरोप केलेत ते खरे आहेत.'

'ज्यांनी त्यांना उभं केलं त्यांनी त्यालाच धक्का मारला. ज्याच्या हाताखाली काम केलं त्याला फसवलं. धक्का मारणं ही त्यांची संस्कृती आहे. रात्री 9 वाजता तटकरे कुटुंबाचे फोन बंद होतात त्यांना कुणाची पर्वा नाही. ते बॅग भरतात आणि दिल्लीत जातात.', असा निशाणा देखील दळवींनी तटकरेंवर साधला.

तटकरे कुटुंबावर टीका करताना दळवी यांनी नाव न घेता आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, काही जण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत.

सुनील तटकरे प्रत्युत्तर देणार

रायगडच्या राजकारणात सुनील तटकरेंच्या विरोधात सगळी शिवसेना एकवटली आहे. पालकमंत्रिपदावरून तटकेर विरुद्ध गोगावले हा वाद सुरू आहे. त्यातच दळवी हे देखील सातत्याने तटकरेंवर टीका करत आहेत. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी वाढतो आहे. दरम्यान, दळवी यांनी केलेल्या टीकेला सुनील तटकरे काय उत्तर देणार याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT