Navneet Rana and Supreme Court : अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याचा मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. अमरावतीमध्ये राणा यांच्यासाठी महायुतीची सभा सुरू असतानाच हा निकाल आला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आजच अर्ज दाखल करणार आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election News) शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याविरोधात राणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दोन्ही गटांचा युक्तिवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला होता.
सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायाधीश माहेश्र्वरी आणि न्यायाधीश संजय करोल यांच्या खंडपीठापुढं सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता, तर आता लोकसभा निवडणुकीअगोदर नवनीत राणा प्रकरणाचा निकाल लागला आहे. जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप अडसूळ यांनी केला होता. हे प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने आज योग्य असल्याचा निकाल दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमरावतीमध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आजच आहे. हायकोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र 2021 मधे अवैध ठरवलं होतं, त्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहाेचलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आज सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल रद्द करत राणांना मोठा दिलासा दिला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.