Supriya sule, Uddhav thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena Supreme Court case: कोर्टात सुनावणी सुरू असतानाच सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; म्हणाल्या, 'शिवसेना ठाकरेंची...'

Supriya Sule statement News : गेल्या पाच दिवसापासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्ह याच्यावर सुनावणी सुरु आहे. सुरु असलेल्या सुनावणीमुळे सत्ताधारी व विरोधकांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्ह याच्यावर सुनावणी सुरु आहे. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करीत आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या सुनावणीमुळे सत्ताधारी व विरोधकांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मोठे विधान केले आहे.

शिवसेना ही ठाकरेंची आहे. शिवसेना यापूर्वी ठाकरेंचीच होती, आजही आहे उद्याही राहील, असे मोठे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला. ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला, त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, आणि समजा एखाद्याचे काही वेगळ मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली, त्या पद्धतीने त्यांनी करायला हवे होते, त्यांना कोणी अडवलं होते. स्वत:च्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणं ही कौतुकाची गोष्ट आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून काढून घेतली असल्याचे सांगताना निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली. शरद पवार यांच्याकडून पक्ष काढून घेतला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने त्यांच्या सोयीप्रमाणे हा पक्ष बहाल केला असल्याचे स्पष्ट केले.

शिक्षणसंस्था, सामाजिक संस्थांसाठी परदेशातून निधी येतो. पोलिआ हा सामाजिक संस्थांच्या मदतीने भारतातून हद्दपार केला. असे काही उपक्रम सगळे मिळून करू शकतो. पण या सामाजिक संस्था या काहीतरी देशद्रोहाचे काम करत आहेत, असा एफसीआरएची भूमिका आहे. ते आम्हाला मान्य नाही, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी FCRA कायद्याला विरोध केला.

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर आहेत, आणि राष्ट्रवादीचे जे संविधान आहे, त्यामध्ये आमदार आणि खासदार याचं मतदान नाही. पक्ष ज्याचा आहे, त्यांच्याकडेच राहील, अशी तरदूत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच आहे, तो कालही होता, आजही होता आणि उद्याही आहे, या संदर्भातील सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत. परंतु दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अतिशय चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्षावर अन्याय केला का? तर केला, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT