Suraj chavhan, ajit pawar, Anjali Damania Sarkarnama
महाराष्ट्र

Anjali Damania Defamation Case : अंजली दमानियांचा अजिदादांच्या शिलेदाराला दणका, ‘सुपारीबाज बाई’ म्हणणे भोवणार!

Suraj Chavan Summoned by Court : मी कायदेशीर कारवाई करायचे ठरवले आणि वांद्रे कोर्टात याचिका केली होती. या प्रकरणाची आज सुनावणी झाली, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

Roshan More

Anjali Damania News : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्य राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी या संदर्भात अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मात्र, अंजली दमानिया या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मुद्दाम टार्गेट करत आहेत, असा दावा करत त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी टीका करताना त्यांची जीभ घसरली होती.

अंजली दमानिया यांचा 'सुपारीबाज बाई' म्हणून सूरज चव्हाण यांनी उल्लेख केला होता. तसेच त्या कोणाच्या रिचार्जवर चालतात असे देखील म्हटले होते. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर दमानिया यांनी कोर्टात धाव घेत मानहानीची याचिका दाखल केली होती.

या मानहानी प्रकरणात सूरज चव्हाण यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे. या विषयी अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'राष्ट्रवादी पक्षाच्या सूरज चव्हाणांवर मी वांद्रे कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती. मला अतिशयअपमानास्पद शब्दात ‘सुपारीबाज बाई’ ‘रीचार्ज वर चालणारी बाई’ म्हटले होते.'

'मी कायदेशीर कारवाई करायचे ठरवले आणि वांद्रे कोर्टात याचिका केली होती. या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मजिस्ट्रेट कोर्टाने सूरज चव्हाणांवर नोटिस काढली आणि 28 जुलै ला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.', असे दमानिया यांनी ट्विट करत सांगितले आहे.

सूरज चव्हाण नेमके काय म्हणाले होते?

सूरज चव्हाण यांनी 21 फेब्रुवारीला ट्विट करत म्हटले होते की, धनंजय मुंडेसाहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यात 25 खोक्याचा बॅनल्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या, अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला पुराव्यासह..लवकरच.

बँक खाते तपासण्याचे आवाहन

सूरज चव्हाण यांनी केलेल्या टीकेनंतर अंजली दमानिया यांनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच तुमच्या घरच्या स्त्रीला रिचार्जवाली बाई कोणी म्हटले तर खपवून घ्याल का? अशी विचारणा करत त्यांचे बँक खाते तपासण्याचे आवाहन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT