Gopinath Munde Suresh Dhas  sarkarnama
महाराष्ट्र

Suresh Dhas : 'गोपीनाथ मुंडे आत्ता गृहमंत्री असते तर आका...', सुरेश धस यांनी स्पष्टच सांगितलं

Gopinath Munde Suresh Dhas santosh deshmukh Murder case Valmik Karad : देवेंद्र फडणवीस हे चांगले गृहमंत्री असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय आहे हे कळत नाही, असे सुरेश धस म्हणाले.

Roshan More

Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांनी अटक केली आहे. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी सरेंडर केले होते. कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एक युट्यूब चॅनलशी दिलेल्या मुलखामतीमध्ये आमदार सुरेश धस यांनी आत्ता गोपीनाथ मुंडे असते आणि त्यांच्याकडे गृहमंत्रिपद असते तर काय केले असते यावर भाष्य केले आहे.

सुरेश धस म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आत्ता गृहमंत्रिपद असते तर आकाच्या आकाचे काय झाले असते याविषयी मी काही सांगू शकत नाही. मात्र आकाने आत्ता जे सरेंडर केले आहे त्याच्या दोन चार दिवस आधीच सरेंडकर केले असते. धस हे आका म्हणून वाल्मिक कराड यांचा उल्लेख करत असतात तर आकाचे आका म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधत असतात.

सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस हे देखील चांगले गृहमंत्री असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय आहे हे कळत नाही. देवेंद्र फडणवीस हे मृदू आहेत, कणखरही आहेत आणि ते कळूनही देत नाही काय करायचे. मनात काय आहे कळत न देण्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात साम्य असल्याचे देखील ते म्हणाले.

पिस्तुल घ्यायला पैसे नाहीत

धश म्हणाले, माझ्याकडे पिस्तुल नाही. पिस्तुल घ्यायलाही पैसे नाहीत. ते घेण्यासाठी दोन तीन लाख रुपये कुठून आणता. 25 वर्ष आमदार आहे पण गरजा फार कमी ठेवल्या आहेत. माझ्या प्राॅपर्टी 26 कोटीची दाखवली आहे. पण तुम्ही पहिल्यापासून बघा माझ्या वडिलांची जी प्राॅपर्टी आहे ती रेडीरेकनरच्या दराने बघा. ते सोडून माझ्याकडे साखर कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT