Telegram Piracy Notice Sarkarnama
महाराष्ट्र

Telegram Piracy Notice : टेलिग्रामला केंद्र सरकारची नोटीस; पायरेटेड चित्रपट-वेब सीरिज हटवण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम

Government directs Telegram to remove piracy channels and submit report within 15 days : चित्रपट, वेब सीरिज आणि ऑडिओ-व्हिज्युअल कंटेंटची पायरसी रोखण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे निर्देश; बेकायदेशीर चॅनेल्स स्वतःहून बंद करण्यास सांगत आयटी कायद्यानुसार कारवाईचा इशारा.

Pradeep Pendhare

Telegram channels : 'नीट’ परीक्षेत पुन्हा काही गैरप्रकार होऊ नये म्हणून टेलिग्राम अ‍ॅपवर परीक्षेदरम्यान बंदी घालण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर अ‍ॅप पुन्हा सुरू झाले. आता वाढत्या पायरेटेड फिल्म्सच्या संदर्भात टेलिग्रामला नोटिस बजावण्यात आली आहे. चित्रपट, वेब मालिका आणि इतर ऑडिओ व्हिजुयल कंटेंटची मोठ्या प्रमाणात पायरसी होते.

अर्थात ओरिजिनल कंटेंटच्या कॉपीज तयार करून त्या सर्रास पोस्ट केल्या जातात. इंटरनेट वापरकर्ते थिएटर आणि ओटीटीचे अधिकृत प्लॅटफॉर्म डावलून मोफत मिळणाऱ्या पायरेटेड कंटेंट पाहण्याला प्राधान्य देतात. यामुळे एकूणच माध्यम क्षेत्राचे मोठे आर्थिक नुकसान होते.

याशिवाय कोणत्या वयोगटातील प्रेक्षकांनी काय पहावे किंवा पाहू नये यावर कोणतेही नियंत्रण अशा गैरप्रकारामुळे राहात नाही. यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry) घेतली आहे. त्यानुसार पायरेटेड कंटेंटला आळा घालण्याच्या सूचना टेलिग्रामला करण्यात आल्या आहेत.

कॉपीराईट नियमांचे उल्लंघन हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे सरकार टेलिग्रामवरील (Social Media) तशी चॅनेल्स शोधून काढेल आणि मग त्यावर कारवाईची सूचना करेल, याची टेलिग्रामने वाट पाहू नये. स्वतः शोध घेऊन तसे चॅनेल्स बंद करावेत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार मध्यस्थ म्हणून आवश्यक ती दक्षता बाळगणे ‘टेलिग्राम’साठी बंधनकारक असल्याची आठवणही सरकारने करून दिली आहे.

‘पायरसी केलेला मजकूर प्लॅटफॉर्मवर सातत्याने उपलब्ध राहिल्यास, नियमांचे पालन टाळण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा सरकारला अपुरी माहिती दिल्यास, लागू असलेल्या कायदेशीर चौकटीअंतर्गत पुढील तपासणी आणि कारवाई केली जाऊ शकते, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच निर्माते, ओटीटी माध्यमे आणि तपास यंत्रणा यांना तक्रार करायची असल्यास टेलिग्रामने तक्रार निवारण यंत्रणा कशा प्रकारे काम करते याचा तपशील मंत्रालयाने मागवला आहे.

टेलिग्रामने नोटिस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काय उपाययोजना केल्या, याविषयीचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. एकूणच केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोशल मीडियावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

नीट फेरपरीक्षेच्या निमित्ताने टेलिग्राम अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली. व्हॉट्स अ‍ॅपने फोन नंबर न दिसता फक्त युजरनेम दाखवणारे फीचर सुरू केल्यानंतर गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘मेटा’ कंपनीला देखील नोटिस बजावली. तसेच इन्स्टाग्रामवर बालशोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवरूनही ‘मेटा’ला नोटिस बजावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT