MVA Politics : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा आपण त्याला पाठिंबा देऊ, असे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले होते. मात्र, ठाकरे गट मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झाला असून मुख्यमंत्रिपदासाठी नवा प्रस्ताव काँग्रेस आणि शरद पवार गटसमोर त्यांनी ठेवल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
या प्रस्तावानुसार ठाकरे गटाकडून कमी जागांवर लढण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद ठाकरे गटाला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी लढण्याचा तयारी ठाकरे गटाकडून दाखवण्यात आली आहे. 2019 ला युतीमध्ये 125 जागांवर शिवसेना लढली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून 95 जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे.
काँग्रेसची 115 जागांची मागणी आहे. मात्र, त्यांनी 105 जागा आणि शरद पवार गटाने 88 जागा लढाव्यात, असा देखील प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसची 115 जागांची मागणी आहे. मात्र, त्यांनी 105 जागा आणि शरद पवार गटाने 88 जागा लढाव्यात, असा देखील प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेसाठी बैठका होत आहेत. या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील काही जागांवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याची देखील माहिती आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी मुख्यमंत्रिपदाबाबद निर्णय हा निवडणुकीच्यानंतर घेऊ, अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून घेतण्यात आली होती. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे धोरण ठरवू, असे देखील काँग्रेसने स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.