Devendra Fadnavis and Chandrasekhar Bawankule
Devendra Fadnavis and Chandrasekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

BJP meeting : भाजप कोअर कमिटीचा मोठा गृहपाठ; विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरली

Pradeep Pendhare

Maharashtra BJP Politics : लोकसभा निवडणुकीनंतर जमिनीवर आलेलं भाजप आगामी काळातील निवडणुकीची रणनीती अगदी सावध आणि बारकाईनं आखत आहेत. विधानपरिषद निवडणुकीची आणि राज्यातील संघटनात्मक बदलावर भाजपच्या कोअर कमिटीत चर्चा झाली.

विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 उमेदवारांवर चर्चा झाली. ही नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवणार आहेत. कोअर कमिटीच्या या मोठ्या गृहपाठाची विरोधकांनी देखील दखल घेतली आहे.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील (Mumbai) निवासस्थानी ही बैठक झाली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे उपस्थित होते. ही बैठक मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. ही बैठक रात्री एक वाजता संपली. ही बैठक विश्लेषणात्मक झाली. संघटनात्मक बांधणीसाठी पुन्हा एकदा भाजप तयारीला लागणार आहे. ज्या मतदारसंघात भाजप कमी पडली आहे, तिथे संघटनात्मक बांधणीवर काम होणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी संघटनात्मक बदल दिसतील.

भाजपच्या (BJP) कोअर कमिटीच्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीची बारकाईनं तयारी केली आहे. निश्चित केलेली 10 नाव दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्याची तयारी केली आहे. ही नावं निश्चित करताना विधानसभा निवडणुकीची सांगड घातली गेली आहे. विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवाराचा फायदा विधानसभेतील निवडणुकीत झाला पाहिजे. यामुळे काही जातीय समीकरणं यात ठेवली आहेत. तसेच उमेदवाराचा विधानसभा क्षेत्रातील प्रभाव देखील तपासला गेला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या आडून भाजप कोअर कमिटीने विधानसभा निवडणुकीची गणिते देखील आखली आहेत. विधानपरिषदसाठी कोणत्या 10 नावांची लाॅटरी निघणार, याची चर्चा सध्या भाजपमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीतील महायुतीमधील भाजपची संख्या खूपच खाली आली. 23 वरून थेट 9 पर्यंत घसरली. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप सावध झाली आहे. विधानसभा निवडणुकीत कोणतीही रिस्क घ्यायला भाजप तयार नाही. त्यामुळे भाजपने गृहपाठ वाढवला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर पहिले भाष्य करण्यात आले. विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना भाजप त्याचा आराखडा तयार करत आहेत. हा आराखडा केंद्र आणि राज्यातील प्रमुख पक्ष नेतृत्वाखांच्या मार्गदर्शनाखाली फायनल करून उमेदवारांची निवड, प्रचार आणि रणनीती आखली जाणार आहे. भाजप कोअर कमिटीची आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT