Bjp Mla Chandrashekhar Bawnkule Sarkarnama
महाराष्ट्र

काॅंग्रेसच्या निर्दयी आणि असंवेदनशीलपणाची इतिहासात नोंद होईल ; आक्षेपावर बावनकुळे संतापले..

टिळक आणि जगताप यांच्या मतपत्रिका अनुक्रमे पती आणि भावाने मतपेटीत टाकल्या, यावर आक्षेप घेण्यात आला. (Bjp)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या आजारी आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काॅंग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. (Bjp) या दोघांच्याही मत पत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा आक्षेप काॅंग्रेसच्या वतीने निवडणुक आयोगाकडे घेण्यात आला. या आक्षेपानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. भाजपचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chnadrashekhar Bawnkule) यांनी हा आक्षेप म्हणजे काॅंग्रेसच्या निदर्यी आणि असंवेदनशीलपणाचा कळस आहे, या घटनेची इतिहासात नोंद होईल, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पाच उमेदवार दिल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप चमत्कार घडवणार की मग महाविकास आघाडीची एकजूट दिसणार? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुपारी मतदान झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी सुरू होणार होती. परंतु भाजपचे आजारी आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काॅंग्रेसच्या (Congress) वतीने आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे मतमोजणीला उशीर झाला.

टिळक आणि जगताप यांच्या मतपत्रिका अनुक्रमे पती आणि भावाने मतपेटीत टाकल्या, यावर आक्षेप घेण्यात आला. निवडणुक आयोगाकडे याची रितसर तक्रार काॅंग्रेसने केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु भाजपने काॅंग्रेसचा हा असंवेदनशीलपणा असल्याची टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या परवानगीनेच मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतपत्रिका या मतपेटी वरच्या बाजुला असल्याने मदतनीसांच्या माध्यामातून टाकण्यात आल्या.

विशेष म्हणजे विधान परिषदेच नाही, तर राज्यसभा निवडणुकीत देखील आम्ही अशीच परवानगी या दोघांच्या मतांसाठी घेतली होती. तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही, मात्र आता पराभव समोर दिसू लागल्याने काॅंग्रेसने हा रडीचा डाव खेळला. राज्यसभा, विधान परिषदच नाही तर अगदी गावातील निवडणुकीसाठी देखील एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याला देखील निवडणुका आयोग मदतनीसाच्या मार्फत मत देण्याची परवानगी देते.

काॅंग्रेसला हा नियम माहित नाही का? असा टोला देखील बानवकुळे यांनी लगावला. काॅंग्रने घेतलेला आक्षेप म्हणजे निर्दयी आणि असंवेदनशीलपणाचा कळस असून याची नोंद नक्कीच इतिहासात एक वाईट घटना म्हणून होईल, असे बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT