uday samant, manoj jarange  Sarkarnama
महाराष्ट्र

Uday Samant On Manoj Jarange : मंत्री उदय सामंतांनी मनोज जरांगेंना सुनावले, 'संविधानीक पदावरील लोकांबद्दल बोलताना विचार करा...'

Uday Samant Maratha Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी बोलताना मंत्री का नाही आले, असा सवाल केला होता.

Roshan More

Uday Samant on Manoj Jarange Latest News : मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. काल रात्री प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत सरकारचा त्यांना प्रस्ताव दिला. मात्र, प्रशासकीय अधिकारी का आले? मंत्री का नाही आले? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला.

जरांगे पाटील यांनी वापरलेल्या भाषेबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले, 'संविधानिक पदावर असलेल्या लोकांबद्दल मनोजदादा जरांगे यांनी बोलताना विचार केला पाहिजे. शेवटी जर आम्ही सकारात्मक तुमच्यासमोर येतोय, सकारात्मक तुमच्यासाठी काम करतोय, तुमच्या प्रकृतीची काळजी करतोय, आम्ही तुमचे हिंतचिंतक आहोत ना.'

'त्यांनी आंदोलन केलं,ताणामुळे त्यांची चिडचीड झाली असेल. ते सुद्धा माननीय देवेंद्रेजी, एकनाथ शिंदेंसाहेबांनी अतिशय संयमाने घेतलं. त्यांनी देखील सांगितलं की मनोज जरांगेंसारखा एखादा कार्यकर्ता मराठा समाजासाठी इतका वेळा आंदोलन करतो, त्यांची चिडचिड होणं स्वाभावीक आहे. येवढ्या सकारात्मकदृष्ट्या आम्ही बघतोय तर त्यांनी देखील सकारात्मकदृष्ट्या पुढे आले पाहिजे.', असे आवाहन देखील सामंत यांनी केले.

सरकार सकारात्मक

जरांगे पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ऐवजी मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, मुद्दा असा आहे मंत्रिसमितीने जो मुसदा तयार केला आहे तो त्यांना आपण दिला आहे. त्यामध्ये त्यांनी काही हवं होतं ते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळापुढे मांडायला हवं होतं. त्यांना मसुद्या बद्दल काय वाटतं, त्याप्रमाणे आपण बदल करू, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

जालना बंदची हाक

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस असूनही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने मराठा कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उद्या जालना बंदची हाक देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT