Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Video Uddhav Thackeray : शरद पवारांच्या समोर मुख्यमंत्रि‍पदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले...

Roshan More

Uddhav Thackeray News : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवार कोण? याच्या चर्चा सुरू असताना शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. तुम्ही कोणालाही मुख्यमंत्री घोषित करा, मी त्यांना पाठींबा देईल. पण यांना सत्तेतून खाली खेचा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहेत. मी आव्हान करतो त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'मुख्यमंत्री चेहरा कोणाचा यावरून चर्चा सुरू आहे. मी आता सांगतोय. पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार इथे आहेत.त्यांनी मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा. मी त्याला आता जाहीर पाठिंबा देईन', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काही झाले तरी महायुतीच्या सरकारला खाली खेचण्याचे आवाहन केले.

'बऱ्याच दिवसांपासून आपल्या तीन आणि सोबतच जे पक्ष आहेत त्यांच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेण्याचे ठरत होतं. पण मुहूर्त सापडत नव्हता. काल 15 ऑगस्ट झाले आणि आज आपण महाविकास आघाडीचा मेळावा घेत आहोत. आजचा मुहूर्त चांगला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करावी आम्ही तयार आहोत', असे ठाकरे म्हणाले.

निवडणूक जिंकणं महत्त्वाचे

मुख्यमंत्रि‍पदासाठी काँग्रेसने, शरद पवार साहेबांनी कुठलाही चेहरा जाहीर करावा, मी त्यांना पाठींबा देतो. पण जागेवरून मारामारी करू नका. एखादी शिवसेनेची जागा काँग्रेसला गेली किंवा काँग्रेसची जागा राष्ट्रवादीला गेली म्हणून काम करायचे नाही, असे करू नका. असे आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT