Uddhav Thackeray Mallikarjun kharge sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : जागावाटपाबाबत उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जून खर्गेंकडे व्यक्त केली 'ही' इच्छा; अडचण असेल तर वरिष्ठ तोडगा काढणार!

Uddhav Thackeray Mallikarjun kharge : विधानसभा निवडणुकीत आधी लढलेल्या काही जागांची वेळ पडल्यास अदलाबदल करायची गरज पडल्यास ती करण्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांचे एकमत झाले आहे.

Roshan More

Uddhav Thackeray News : लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचे काॅन्फिडन्स वाढला आहे. मात्र, विधानसभेला कोणतीही चूक करायची नाही, याचा निश्चित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला दिसतोय.

लोकसभेला जागा वाटपावेळी झालेल्या चुकीमुळे काही जागा महाविकास आघाडीला गमवाव्या लागल्या त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपासाठी विशेष काळजी घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली.

या भेटीत जागा वाटप लवकर पूर्ण झाल्या तर प्रचाराला जास्त वेळ मिळेल. त्यामुळे 10 सप्टेंबरच्या आत जागावाटप पूर्ण व्हायला हवं, अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती सुत्रांनी 'साम टिव्ही'ला दिली आहे.

जागा वाटपामध्ये काही जागांची अडचण असेल तर वरिष्ठ नेते बसून यावर तोगडा काढू. पण त्यासाठी जागा वाटप रखडायला नको. जागा वाटपाचा निर्णय लवकर व्हायला हवा, अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आधी लढलेल्या काही जागांची वेळ पडल्यास अदलाबदल करायची गरज पडल्यास ती करण्यावर तिन्ही पक्षातील नेत्यांचे एकमत झाले आहे.

लोकसभेतील चुका टाळणार

लोकसभेला महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. मात्र, महाविकास आघाडीच्या आणखी काही जागा वाढू शकल्या असत्या. त्यामुळे जागावाटप लवकर करून लोकसभेला झालेल्या चुका कशा टाळता येतील यावर देखील खर्गे-ठाकरे यांच्या बैठकीत चर्चा झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT