Uddhav Thackeray On Raj Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray On Raj Thackeray : उद्धव यांनी राज ठाकरेंचाही हिशेब चुकता केला; म्हणाले, 'उघड पाठिंबा म्हणजे 'बिनशर्ट' पाठिंबा...'

Pradeep Pendhare

Shivsena Anniversary : उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्यांची जोरदार खिल्ली उडवली. बिनशर्त पाठिंब्यांचा उल्लेख 'बिनशर्ट', असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी करताच सभागृहात एकच हशा झाला. शिट्या वाजल्या. या निवडणुकीमुळे आपले कोण? आणि परके कोण?, मित्र कोण? आणि शत्रू कोण? हे उघड झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेचा 58 वा वर्धापनदिन आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली दोन वेगवेगळे वर्धापनदिन साजरे झाले. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे वर्धापनदिनात काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. गद्दार, भाजपपासून ते हिंदुत्वापर्यंत सर्वच मुद्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या 'बिनशर्त' पाठिंब्यावर देखील ठाकरी शैलीत प्रहार केला.

"काही जणांना उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला. बिनशर्ट... अरे, उघड पाठिंबा म्हणजे! बिनशर्ट... म्हणजे उघड पाठिंबा. म्हणजे 'बिनशर्ट' ना! बरोबर की चूक? काय, नको नको उद्धव ठाकरे नको. बघा, मी हा शर्ट काढला. 'बिनशर्ट' पाठिंबा देतो तुम्हाला. म्हणजेच उघड!", असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) बिनशर्तची खिल्ली उडवली.

"काही जणांनी भाजपला विरोध करून पाठिंबा दिला. डोम करून पाठिंबा दिला. लढण्याचे नाटक करून केले. आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. ही कला बऱ्याच अंशी मोदींना जमते. ती आम्हाला जमत नाही. आम्हाला जमणार नाही", असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना डिवचले.

पंतप्रधान मोदींना दिले आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. "तु्म्ही आजपासून विधानसभेचा प्रचार सुरू करा. मी आहे आणि तुम्ही आहेत. फक्त षढं बाजुला ठेवा. नाव चोरायचे नाही. वडील चोरायचे. धनुष्य चोरायचा नाही. धनुष्य बाण बाजुला ठेवा आणि समोर या. मिंधेच्या वडिलांचे फोटो लावून समोर या. माझ्या वडिलांचा फोटो लावून माझा स्ट्राइक रेट सांगता तुम्ही. षढं कुठले! यांच्याकडून काही राज्याचं भविष्य होणार नाही", असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT