Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Hindi Imposition Politics : उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती स्वीकारली? 'त्या' दाव्याची पुराव्यानिशी पोलखोल! जीआरच वाचून दाखवला

Uddhav Thackeray Anil Parab : हिंदी सक्तीचा स्वीकार माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारून त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा दावा भाजप नेते करत आहेत.

Roshan More

Hindi Compulsory Contravarci : ठाकरे बंधु एकत्र येत हिंदी अंमलबजावणीचे जीआर रद्द केल्याबद्दल विजयी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याची जोरदार तयारी देखील सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा स्वीकार माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारून त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा दावा केला होता. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते देखील हिंदी सक्तीसाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका करत आहेत.

माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारून ठाकरेंनीच हिंदी सक्ती केली का? या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी देत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची पोलखोल केली आहे.

अनिल परब एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत म्हटले, 'जानेवारी 2022 मध्ये माशेलकर समितीचा अहवाल आला. तो मंत्रिमंडळात ठेवण्यात आला तेव्हा मी देखील तेथे होतो. मात्र, या अहवालावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. भाषेच्या संदर्भात दिलेल्या या अहवालावर काय भूमिका घ्यायची यासाठी तो अहवाल अभ्यास गटाकडे पाठवण्यात आला. जानेवारी ते जुलै 2022 या कालावधीत अभ्यास गटाची एकही बैठक झाली नाही.'

'अभ्यासगटाची एकही बैठक न झाल्याचे रेकाॅर्डवर आहे. त्यामुळे या माशेलकर समितीने दिलेला अहवालावर निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही. आणि त्यात जुलै 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार गेले. देवेंद्र फडणवीस हे दिशा बदलत आहेत. माझ्याकडे तारखेसह जीआर आहे.', असे परब यांनी सांगितले.

परब यांनी पुरावाच दिला

माशेलकर समितीबाबत झालेल्या निर्णयाचा जीआरच अनिल परब यांनी दाखवला. त्यामध्ये समितीबाबत निर्णय आणि अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेण्यासाठी कृती अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उल्लेख आहे. अभ्यास गटाच्या निर्णयानंतर त्याची अंमलबाजवणी करायची की नाही हे ठरते, असे परब यांनी सांगितले आणि यावर काही निर्णय होण्याच्या आधीच महाविकास आघाडीचे सरकार गेल्याची आठवणही परब यांनी करून दिली.

पाच जुलैला विजयी मेळावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यापूर्वी हिंदीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत भव्य मोर्चा काढणार होते. मात्र, आता जीआर रद्द झाल्याने पाच जुलैला दोन्ही ठाकरे एकत्र येत विजयी मेळावा घेणार आहेत. हा मेळावा पक्षविरहीत असेल यामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा असणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT