uddhav thackeray, Rahul Gandhi sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav thackeray News : भाजपच्या 400 पार नाऱ्याची ठाकरेंनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Political News : देशातील हुकूमशाही वृत्ती मोडीत काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येत 'अबकी बार भाजप तडीपार' ही घोषणा देत. देशातील दहा वर्षांची हुकूमशाही उलथून टाका, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Sachin Waghmare

Mumbai News : 'खरं पाहिलं तर हा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली. त्यांची स्वप्न आम्हाला सुद्धा विचारतात तेव्हा तुमच्या किती सीट येतील तेव्हा विचारलं तेव्हा चारशे पार म्हणता ते काय फर्निचर दुकान आहे का?' असा घणाघात करीत दिल्लीतील हुकूमशाही तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडण्यात आले, असे सांगत भाजपच्या चारशे पार नाऱ्याची शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

शिवतीर्थावरील इंडिया आघाडीच्या सभेप्रसंगी ते बोलत होते. इंडिया आघाडीतील दिग्गज नेते शिवाजी पार्कवरील सभेस उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बिनधास्त गप्पा मारताना दिसून आले. (Uddhav thackeray News)

मुंबईतूनच 1942 साली महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चलेजाव म्हटले होते. शिवतीर्थावरील इंडिया आघाडीच्या या सभेसाठी कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सर्वजण एकवटले आहेत. देशातील हुकूमशाही वृत्ती मोडीत काढण्यासाठी येत्या काळात सर्वांनी एकत्र येत 'अबकी बार भाजप तडीपार' ही घोषणा देत, देशातील दहा वर्षांची हुकूमशाही सत्ता उलथून टाका, असा घणाघात ठाकरे यांनी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपली ओळख देश असली पाहीजे. व्यक्ती म्हणजे देश व्हायला नको. देश हाच माझा धर्म आहे. आपली लढाई लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी आहे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. जेव्हा जनता एकत्र येते तेव्हा हुकूमशाह नष्ट होतो. अबकी बार भाजप तडीपार, असा नारा ठाकरे (uddhav Thackeray) यांनी दिला.

काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन केले. इंडिया आघाडीतील दिग्गज नेते शिवाजी पार्कवर आले होते. यावेळी आयोजित सभेत शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.

SCROLL FOR NEXT